व्ही.आय.पीं.च्या वाढत्या संख्येमुळे पोलिसांची दमछाक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी वाढतच चालली आहे. मात्र भक्तांबरोबरच व्ही.आय.पीं.चीही संख्या वाढत असल्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवता पुरवता पोलिसांची मात्र दमछाक होते आहे.


                                     

ADVT - 
फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


शिर्डीत सध्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र त्याचबरोबर राज्य तसेच केंद्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी तसेच पुढारी, नेते, मंत्री यांची संख्या वाढत आहे. अशा वेळी त्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांवर येते.

पोलीस ठाण्यात अंमलदार, मदतनीस, वारलेस ऑपरेटर, एक चालक, लेखनिक असे पाच ते सहा कर्मचारी व्यस्त असतात. त्याचबरोबर बसस्थानक, विश्रामगृह, रुग्णालय व इन्साफकरीता कर्मचारी हवे असतात. त्याचबरोबर रजेवर असणारे कर्मचारी तसेच गावात पेट्रोलिंगसाठी लागणारे कर्मचारी, सन, उत्सवामध्ये बंदोबस्तात पोलीस बळ गुंतून पडते. 

त्याचबरोबर शिर्डीत धार्मिक, राजकीय व अनेक पक्षांचे मोठे मेळावे होतात, अशा वेळी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागते. व्ही.आय.पी. असेल तर शिर्डीत प्रवेश आगमनापासून थेट दर्शन होऊन शहराच्या हद्दीबाहेर सोडण्यापर्यंत व्यवस्था करावी लागते. 

अशा वेळी अनेक कर्मचारी या कामात गुंतून पडतात. त्याचा फायदा शिर्डीतील गुन्हेगार आपला हेतू साध्य करून घेण्यासाठी करतात. रोजच्या कामातून तर सुटका नाहीच पण बंदोबस्ताचे वाढते काम हे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. 

अशा परिस्थितीत तपास करणे जिकरीचे काम आहे. काही दिवसांपूर्वी दोन लोकांनी वीष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अशा वेळी तपासी अधिकाऱ्यांवर मोठे दडपण असते. त्यातच विमानतळ सुरू झालेले आहे. त्यामुळे व्ही.आय.पीं.ची संख्याही वाढणार आहे. त्याप्रमाणात पोलिसांचे संख्याबळही वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.