राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस करणार नगरकरांना जागे करण्याचे काम.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दिल्लीगेट परिसरात रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नगरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या त्रासाचा निषेध करून जाणाऱ्या-येणाऱ्याना शहर जिल्हाध्यक्षा रेश्‍मा चव्हाण-आठरे यांनी तोंडाला लावण्याच्या मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व लहान बालकेदेखील उपस्थित होती.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

रेश्‍मा चव्हाण-आठरे म्हणाल्या की, दिल्लीगेट परिसरातील या प्रचंड धुळीमुळे या रस्त्यावरून जाणेयेणे मुश्‍किल झाले आहे. याच मार्गावर कॉलेज असल्याने व उपनगरात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. या धुळीमुळे अनेकांना श्‍वसनाचे विकार कायमचे जडले असून, याला जबाबदार कोण असा प्रश्‍न मी उपस्थित करीत आहे.

अनेकवेळा या प्रश्‍नासाठी आंदोलने केली. प्रश्‍न मार्गी लागावा, यासाठी आयुक्तांना निवेदन दिले. मात्र, ढिम्म प्रशासनाने या ठिकाणी दुरुस्ती करण्याऐवजी तेथे मातीमिश्रित मुरूम टाकला. त्यामुळे धुळीचे प्रमाण अधिकच वाढले. शहरातील अनेक भागात गटारीची कामे करण्यात आली आहेत. मात्र, त्यानंतर तेथे पडलेली मातीही उचलण्यात आलेली नाही. 

या सगळ्याचा परिणाम म्हणजे शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत नगरकरांनी आता सोशीक न राहता आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.नगर शहरातील एकही रस्ता असा नाही की त्या रस्त्यावर खड्डे नाहीत व धुळीचे साम्राज्य नाही. रस्त्याकडेला जेथे तेथे कचरा साठलेला आहे. मनपा अधिकारी कशात मश्‍गुल आहेत हेच समजायला मार्ग नाही.

 शहरातील खड्डे बुजविण्याचे काम चांगल्या अनुभवी काम करणार्यास दिले असते, मध्ये मलई खाल्ली नसती, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. याप्रसंगी रेश्‍मा चव्हाण-आठरे यांनी व्यक्त करून सोशीक नगरकरांना जागे होण्याचे आवाहन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.