शासकीय ताफ्यातील वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रपतींच्या दौऱ्यातील वाहनाच्या धडकेनेनगर- मनमाड रस्त्यावरील जेऊर कुंभारी येथेएकाचा मृत्यू झाला. तालुक्‍यातील काकडी विमानतळाचे उद्‌घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमादरम्यान शासकीय अधिकाऱ्यांचा ताफा मागवण्यात आला होता. नंदुरबार मुख्यालयातील सरकारी बोलेरो जीपचा यात समावेश होता.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या वाहनावरील चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष खुशाल मोरे 1 ऑक्‍टोबरला दुपारी 4 वाजता नगर- मनमाड रस्त्यावरुन जात होते. जेऊर कुंभारी शिवारात भाऊसाहेब शंकर बिडवे (वय 70, रा. तीन चारी, कोकमठाण, कोपरगाव ) यांच्या सायकलला या जीपची धडक बसली.

यात भाऊसाहेब बिडवेयांचा जागीच मृत्यू झाला. कैलास भास्कर वाघ यांच्या फिर्यादीवरून चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष मोरे यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास साहाय्यक फौजदार आर. बी. भालेराव करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.