राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही - तृप्ती देसाई.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणाची चाैकशी करून आरोपी ए सी पी निपुंगे यांना आठ दिवसांत अटक झाली नाही तर ठाणे आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा देऊन गृहमंञ्यानी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भुमाता बिग्रेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली. तसेच सदर प्रकरणाचा निकाल लवकर लावण्यासाठी सदर खटला फास्ट ट्रेक कोर्टात चालवावा अशी मागणीही त्यांनी केली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील व मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेली सुभद्रा पवार हिने वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेचा निषेध व अत्महत्येस कारणीभूत अारोपीस अटक व्हावी, सुभद्राला न्याय मिळावा या मागण्यासाठी भुमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहरातून सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी महिला ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षा अॅड मंगल हांडे,नगरसेविका सोनाली नाईकवाडी, माजी सरपंच सुमनताई जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस राहुल देशमुख, भाजपा जि.प सदस्य डॅा.किरण लहामटे,सेना युवा नेते सतिष भांगरे, अभिनेत्री योगिता दांडेकर , युवक कॅाग्रसचे शहराध्यक्ष निखिल जगताप , पं.सं.उपसभापती मारूती मॆंगाळ सह सर्वपक्षीय कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना देसाई म्हणाल्या आपण ज्या पोलिसांना रक्षक म्हणतो आज ते रक्षकच भक्षक व्हायला लागले तर दाद कुणाकडे मागायची अशी परिस्थिती झाली आहे अाज सुभद्राला जाऊन एक महिना होत आहे तरि अद्याप आरोपी ए.सी पी निपुंगे मोकाट फिरत आहे.पोलिस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अशी शंका आहे 

कारण सुभद्राच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या भावाला आठ दिवसात आरोपी अटक करु असे सांगितले माञ महिन्यानंतरहि आरोपी फरारच आहे .उद्या आपल्यापैकि कुणीही सुभद्रा होउ शकते तेव्हा आता आठ दिवसात आरोपी ए सी पी निपुंगे याला अटक झाली नाहि तर ठाणे पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करुन प्रसंगी मंञ्यालयात जाऊन गृहमंत्री यांना घेरून त्यांचा राजीनामा घेऊ.

आता महिलावर होणाऱ्या अत्याचार सहन होत नाही तेव्हा उद्या कायदाही हातात घ्यायला आम्ही मागे हटणार नाही हे शासनाने लक्षात घ्यावे .सुभद्रा पवार घटनेची सी.बी आय अथवा सी आय डी चाैकशी व्हावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना लवकरात लवकर शिक्षा व्हावी.

तसेच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमनुक करावी अशी मागणी करुन या घटनेतील आरोपीला फाशी झाली पाहिजे जेणेकरून यापुढे अशा घटनांना आळा बसेल. यापुढील काळात महिलांकडे जर वाईट नजरेने पाहाल तरी आम्ही ताईगीरी चा दणका देऊ अशा इशारा यावेळी दिला.

याप्रसंगी सुञसंचलन संभाजी बिग्रेडचे डॅा.संदीप कडलग यानी केले. तर महाविद्यालयीन विद्यार्थीनीनीही मनोगत व्यक्त केले.अॅड मंगल हांडे यांनी शासन महिलांना आज आरक्षण देत आहे माञ सरक्षण राहिले नसल्याची खंत व्यक्त केली.

राज्याला गृहमंत्रीच नाही - तृप्ती देसाई
राज्यात हे सरकार आल्यापासुन राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नाही मुख्यमंत्रीच अतिरिक्त कारभार पाहतात. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही महिला सुरक्षित नाही अनेक निष्पाप जीव जात आहे .आता येत्या मंञीमंडळ विस्तारात तरी मुख्यमंत्र्यांनी एक चांगला स्वतंत्र गृहमंत्री राज्याला द्यावा अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.