अठरा वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील नांदूर -खंदरमाळ परिसरातील खैरदरा सुसरदरा डोंगरात एका अठरा वर्षीय तरुणाने दोरीच्या साहाय्याने म्हारुकाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.४) सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जिजाबा हिरामण दुधवडे (रा.खैरदरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिजाभाऊ दुधवडे हा तरुण आपल्या आई-वडिलांसोबत खैरदरा याठिकाणी राहत होता. डाळिंब तोडण्याचे काम तो करत होता. चार दिवसांपासून तो बेपत्ता झाला होता. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या पूर्वी खैरदरा येथील सुसरदरा डोंगरामध्ये असलेल्या म्हारुकाच्या झाडाला लटकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे. 

घटनेची माहिती नांदूर गावचे पोलीस पाटील किसन सुपेकर यांनी दूरध्वनीवरुन घारगाव पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट, उपनिरीक्षक अन्सार इनामदार, सहाय्यक फौजदार कैलास परांडे, रवींद्र वायकर, श्री. वायाळ या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली.

दुधवडे या तरुणाचा मृतदेह सुसरदरा डोंगरातील पाचशे फूट खोल दरीत असणाऱ्या म्हारुकाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह पूर्णपणे कुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही सुटलेली होती. त्यामुळे पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह झाडावरुन खाली घेतला आणि घारगाव व चंदनापुरीचे वैद्यकिय अधिकारी डॉ.आर. एम. भिसे व डॉ.देशमुख यांनी मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन केले. 

याप्रकरणी पोलीस पाटील किसन सुपेकर यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास परांडे हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.