बालिकाश्रम रोडवरील तरुणीवर अत्याचार करणार्या पोलीसास अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर येथील बालिकाश्रम रोडवरील एका तरुणीवर अत्याचार करून गर्भपात करण्यात आल्याच्या घटनेतील आरोपी पोलिस कर्मचारी गणेश रामदास अकोलकर यास पोलिसांना अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे..

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २६ डिसेंबर २०१६ ते ६ एप्रिल २०१७ या कालावधीत गणेश अकोलकर याने एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला होता. या दरम्यान तरुणी गरोदर राहिली असता अकोलकर याने बालिकाश्रम येथील एका खासगी रुग्णालयात गर्भपात केला होता.

ही घटना घडल्यापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर बुधवारी दि.४ रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या पथकाने अकोलकर यास ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, पीडीत तरूणीने अकोलकरसह गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला आरोपी करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले होते. आरोपींना अटक झाली नाही तर स्वातंत्र्यदिनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. 

पोलीस यंत्रणेच्या तपासावर पीडित तरुणीने प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आरोपी हा एका मोठया नेत्याचा सुरक्षारक्षक असल्यामुळे त्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप पीडितेने केला होता. अखेर आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.