सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या भोवती चिकटतील.नंतर कोणीच किमत देत नाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या भोवती चिकटतील. सत्तेबाहेर गेल्यानंतर कोणीच किमत देत नाही. त्यामुळे राजकारण करताना ते निवडून येण्यापुरते मर्यादित ठेवून सामाजिक कार्याला महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शिवाजी रोडवरील जैन स्थानकात श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने आयोजित नवदुर्गा उत्सव २०१७ कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच मिस आणि मिसेस स्पर्धाही घेण्यात आली.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक, डॉ. उषा पंतवैद्य, डॉ. वैजयंती बधे, नगरसेविका समिना शेख, मंजुश्री मुरकुटे, प्रणिती चव्हाण, स्नेहल खोरे, जयश्री शिंदे, अनिता ढोकणे, शितल गवारे, अल्तमेश पटेल, अक्सा पटेल, जायदाबी कुरेशी, निलोफर शेख आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.