पडझड झालेला संसार पद्मशाली फाऊंडेशनच्या तरुणांनी सावरला!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समाजात असंख्य अशी कुटूंबे आहेत कि जी पोटाची खळगी भरण्यासाठी अद्याप कष्ट करुनही 2 वेळचे जेवण पुरेसा मिळत नाही. अशा परिस्थितीत जर कुटूंबाचा कर्ता माणूस अंपगत्व येऊन घरी बसला तर त्या कुटूंबाचा संसार पडझड झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन पद्मशाली सोशल फाऊंडेशनचे सचिव अजय लयचेट्टी यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगर मधील एकदंत कॉलनी येथील नरेश कंडेपल्ली या गरीब वृत्तपत्र विक्रेत्यावर गणेश विसर्जनाच्या दिवशी आस्मानी संकट कोसळावे त्याप्रमाणे एका अपघातात त्याच्या उजव्या पायाला अपघात होऊन कायमस्वरुपी अंपगत्व आले अशा या परिस्थितीत कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला.शस्त्रक्रियेसाठी मदतीतून हातभार लागला.पण घर चालणार कसे ? पत्नी, 2 मुले यांचे पालपोषण करणारा जर घरात बसला त्या कुटूंबाचे काय हाल होतील ?

या गंभीर घटनेची दखल पद्मशाली सोशल फाऊंडेशन,बजरंग मार्कंडेय सेवा मंडळ, मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठान, शिवक्रांती तरुण मंडळ, नवरंग व्यायाम शाळा, एकदंत गणेश मंडळ अशा 6 मंडळांनी एकत्र येऊन नरेश कंडेपल्ली या कुटूंबाला आधार देण्यासाठी तरुण पुढे सावरले असे सांगुन लयचेट्टी पुढे म्हणाले कि, दिवाळी सणासाठी उपासमारी होऊ नये म्हणून 3महिने पुरेल एवढा किराणा या 6 मंडळातर्फे देण्यात आला. असे सांगितले.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहित गुंडू म्हणाले कि, समाजात गरजूंना मदत देऊन त्यांची गरज पूर्ण करण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे. तरुण कार्यकर्ते स्वत:हून फाऊंडेशनकडे मदत देतात या मदतीमुळे पडझड होणारा संसार पुन्हा उभा राहतो याचे समाधान कंडेपेल्ली कुटूंबाने व्यक्त केले. गोर गरीब, दिन-दुबळे, रंजले-गांजले यांना मदत देण्याचा आमचा स्तुत्य उपक्रम कामय स्वरुपी ठेवणार असल्याचे लयचेट्टी यांनी सांगितले.

यावेळी परिसरताील नागरीकांनी या परिवराला इतर मदत देण्याचे जाहिर केले. याबद्दल पद्मशाली सोशल फाऊंडेशनने सर्वांना धन्यवाद दिले. यावेळी फाऊंडेशन व 5 मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी गोणे यांनी केले. तर आभार भिमराज कोडम यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.