उपसभापती पदासाठी कर्ज काढून नोटांची बंडले मोजून दिली - दीपक पवार.


दैनिक नगर सह्यद्री / शरद झावरे पाटील :- दिवंगत पोपटराव पवार यांनी माजी आमदार स्व.वसंतराव झावरे यांच्या खांद्याला खांदा लावुन अनेक वर्षे काम केले असताना पारनेर पंचायत समितीचे उपसभापती पद घेताना कर्ज काढून युवा नेत्याला किंमत मोजावी लागली असल्याचा गौप्यस्फोट पारनेर पं.स.चे उपसभापती दिपक पवार यांनी दैनिक नगर सह्याद्रीशी बोलताना केला आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सुजित झावरे यांचे काडीचेही योगदान नाही 
सुपा गणातून निवडुन येण्यासाठी सुजित झावरे यांचे काडीचेही योगदान नसुन माझे वडिल पोपटराव पवार यांच्या पुण्याईवर निवडुण आल्याचे उपसभापती दिपक पवार यांनी सांगितले. माझ्या गणात एकही सभा अथवा एकाही कार्यकर्त्यांला सुजित झावरे यांनी सांगितले नसुन पोपटराव पवार यांनी केलेली कामे या निवडीचे फलित असल्याचे पवार म्हणाले. 

सुजित झावरे यांनी आत्मचिंतन करावे
पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षातून माजी सभापती काशिनाथ दाते माजी जि.प.सदस्य विश्वनाथ कोरडे वसंतराव चेडे बाबासाहेब तांबे यांच्यासह अनेक मंडळींना राष्ट्रवादी का सोडावी याचे आत्मचिंतन सुजित झावरे करावे असा टोलाही उपसभापती दिपक पवार यांनी लावला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला असुन या वादास सुजित झावरे जबाबदार असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

सुजित झावरे यांच्याकडुन अन्याय 
राष्ट्रवादीतील बहुतांश नेते मग जिल्हा बॅकेचे माजी उपाध्यक्ष अॅड.उदय शेळके मधुकर उचाळे अशोक सावंत यांच्याशी पण सुजित झावरे यांचे जमत नसुन पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर सुजित झावरे यांच्याकडुन अन्याय होत असल्याचा आरोप उपसभापती पवार यांनी केला आहे.

गावागावात दोन गट पाडुन कार्यकर्त्यांना त्रास 
 १० वर्षे तालुक्याचे आमदार म्हणून स्व.वसंतराव झावरे यांचा नावलौकिक असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात माणसे जपली कार्यकर्ते मोठे केले.परंतु आता गावागावात दोन गट पाडुन कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम चालु असुन यामध्ये पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे.त्याचा परिणाम हा सुजित झावरेंना विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे दिपक पवार म्हणाले.

निष्ठावान व प्रामाणिक काम करणारा नेत्यांना व कार्यकर्त्यांना तालुक्यात त्रास !
१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या निवडक कार्यकर्त्यांनी सुपा येथील विश्रामगृहावर या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून उपसभापती दिपक पवार माजी.पं.स.सदस्य गंगाराम रोहकले अशोक सावंत राळेगणचे माजी सरपंच जयसिंग मापारी दिनेश औटी भाऊसाहेब लामखडे माजी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर सोमनाथ वरखडे उमेश सोनवणे नाथाभाऊ वाकडे यांनी तातडीची बैठक घेवुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

मंचर येथे माजी पालकमंत्री दिलीप वळसे यांच्या कडे आपल्या सर्व भावना पण त्यांनी बोलुन दाखवल्या.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे निष्ठावान व प्रामाणिक काम करणारा नेत्यांना व कार्यकर्त्यांना तालुक्यात त्रास होणार असेल तर आम्ही पक्ष सोडतो अशी जाहिर भुमिका या कार्यकर्त्यांनी वळसे पाटलांसमोर मांडली.परंतु वळसे पाटलांनी कोणीही पक्ष सोडुन जावु नये अशी विनंती करत यासबंधीची तातडीने पारनेर तालुक्यात स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन दिले असुन या वादावर तोडगा निघण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. 

उपसभापती अविश्वासासाठी युवा नेत्याचा खटाटोप..
पारनेर पंचायत समिती मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असून युतीमध्ये काॅग्रेसला सभापती पद तर उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे .परंतु राष्ट्रवादीला उपसभापती पदासाठी मला दुसरांचे उंबरठे का झिजायवायला लावले या पाठीमागे कोण आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहित आहे.

त्यामुळे उपसभापती पद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मुळे मिळाले असुन स्थानिक पातळीवर कर्जे काढून नेत्याला त्याची किंमत मोजावी लागली आहे.तर आता महिन्याभरापासुन या नेत्यानेच माझ्यावर उपसभापती पदासाठी अविश्वास आणण्यासाठी हालचाली केल्या असुन यासबंधीचे तक्रार आपण पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचे उपसभापती पवार यांनी म्हटले आहे.

खासदार गांधींचे काम करण्याचे आदेश..पवार यांचा गौप्यस्फोट 
खासदारकीच्या निवडणुकीत पारनेर तालुक्यातील या युवा नेत्याने पक्षाचा उमेदवार असताना त्यांचे काम न करण्याचे आदेश आम्हांला दिले होते.त्याऐवजी भारतीय जनता पार्टीचे खासदार दिलीप गांधी यांचे काम करावे असे आदेश दिल्याने या नेत्याच्या पक्षनिष्ठेवर चिन्ह निर्माण झाले आहे.त्यामुळे या सर्व बाबी पक्षश्रेष्ठींशी बोलणे झाले असुन पक्षाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचे उपसभापती दिपक पवार यांनी सांगितले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.