अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या नणंदेचा प्रियकराच्या माध्यमातून काढला काटा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या नणंदेचा भावजयीने प्रियकराच्या माध्यमातून काटा काढला. तसेच प्रेताची विल्हेवाट लावली. २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल होती. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तपासादरम्यान आरोपींना काल (दि. २ ऑक्टोबर) अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.फसाबाई गोगा खाडे असे खून करण्यात आलेल्या नणंदेचे नाव आहे. नामदेव तुकाराम खाडे, अनिता सखाराम खाडे, गणेश रोहिदास खाडे अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी : नामदेव खाडे याचे मयत फसाबाई गोगा खाडे हिची वहिनी अनिता खाडे हिच्याबरोबर अनैतिक संबंध होते. या संबंधाची कुणकुण फसाबाईला लागल्यानंतर तिने घरच्यांना याबाबत कल्पना दिली. त्यामुळे अनिताला कुटुंबियाकडून तंबी मिळाली होती. 

अनैतिक संबंधाचे बिंग फुटण्यामागे फसाबाईच कारणीभूत असल्याने अनिता प्रियकर नामदेवला वारंवार फसाबाईचा अडथळा दूर करण्यास सांगत होती. फसाबाई बारी येथील महाविद्यालयात बारवीचे शिक्षण घेत होती. नवरात्रीच्या कालावधीमध्ये दि. २७ सप्टेंबर रोजी सातव्या माळीला फसाबाई सकाळी साडेसात वाजता महाविद्यायाला जायला निघाली. 

तिच्या वाटेवर नामदेव व त्याचा मित्र गणेश खाडे दबा धरुन बसले होते. टप्प्यात येताच फसाबाईवर दोघांनी झडप घातली. तिचा गळा दाबून खून केला. नामदेव हा मागील वर्षी शेळ्या चरण्याचे काम करत असल्याने त्याला परिसरातील जंगलाची बऱ्यापैकी माहिती झालेली होती. त्यामुळे प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी नामदेवने बनाच्या जाळीत एका दगडाच्या कपारीत गोणीत फसाबाईचा मृतदेह ठेवून दिला व ते दोघे निघून गेले होते. 

दरम्यान, सातव्या माळीलाच राजूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक उजगरे हे तपास करत होते. तपासादरम्यान अनिता व नामदेव यांच्यातील अनैतिक संबंधाबाबत पोलिसांना माहिती मिळाली.

यावरून नामदेव खाडे व गणेश खाडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच फसाबाईचा मृतदेह कुठे ठेवला आहे याचीही माहिती दिली. पोलिसांनी नामदेव खाडे, गणेश खाडे व अनिता खाडे या तिघांना अटक केली. दरम्यान, मृतदेहाला बरेच दिवस झालेले असल्याने तो कुजला होता.

या खुनाचा तपास पोलीस उपअधीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरत जाधव, उपनिरिक्षक अशोक उजगरे, नितिन सोनवणे, किशोर तळपे, सुरेश कदम, प्रविण थोरात, राजेंद्र वाकचौरे आणि संगिता आहेर हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.