कोपरगावात जमिनीच्या वादावरून मारहाण; तीनजण जखमी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतात बाजरी सोंगत असतांना आरोपींनी येऊन शेतात पाय ठेवायचा नाही, बाजरी सोंगाणाची नाही, असे म्हणून हातातील लोखंडी कुऱ्हाडीने व लोखंडी पाते असलेल्या खुरप्याने तीन जणांना डोक्­यावर, हातावर व कानावर मारून जबर जखमी केले. शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. या जखमींनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी चारजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्­यातील संवत्सर शिवारातील कासली रोडवरील मंगळवारी (दि. ३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्यादी सायरा सिकंदर तांबोळी (वय २९), पती सिकंदर शरीफ तांबोळी, सासू लैला शरीफ तांबोळी (सर्व रा. संवत्सर) हे आपल्या स्वत:हाच्या शेतात बाजरी सोंगत असतांना आरोपी हुसेन नजीर तांबेाळी, राज हुसेन तांबोळी, मोहसीन हुसेन तांबेाळी, नाजमीन हुसेन तांबोळी (सर्व रा. टिळकनगर, कोपरगाव) शेतात आले व शेतात पाय ठेवायचा नाही, बाजरी सोंगाणाची नाही असे म्हणून हातातील लोखंडी कुऱ्हाडीने व लोखंडी पाते असलेल्या खुरप्याने तीन जणांना डोक्­यावर, हातावर व कानावर मारून जबर जखमी केले.

शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद सायरा तांबोळी यांनी कोपरगाव शहर पोलीसात दिली. या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गु.र.नं. १२७ / १७ भादंवी कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यत आला आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए. व्ही. गवसणे अधिक तपास करीत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.