साईबाबांना चार दिवसात साईचरणी ४ कोटी ७१ लाखांचे दान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईबाबांना पुण्यतिथी उत्सवानिमित्त भक्तांनी चार दिवसात ४ कोटी ७१ लाख रुपयांचे भरभरुन दान दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्सवादरम्यान १ कोटी रुपयांचे दान अधिक जमा झाले आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत पत्रकार परिषदेत माहीती देताना साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, साईबाबांनी श्रद्धा, सबुरी व सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. बाबांची महती दिवसेंदिवस वाढत असल्याने भक्तांच्या गर्दीबरोबरच दानातही वाढ होत आहे.

यंदाच्या उत्सवात सुमारे ३ लाख २५ हजार भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. नुकत्याच संपन्न झालेल्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दानपेटी व तसेच देगणी काउंटरवर जमा झालेल्या दानाची नुकतीच मोजदाद करण्यात आली. चार दिवसात सुमारे ४ कोटी ७१ लाख रुपयांची देगणी जमा झाली. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्सवादरम्यान १ कोटीने वाढ झाली आहे. या दानात दक्षिणा पेटीच्या माध्यमातून सुमारे २ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपये इतके रोख स्वरूपात दान प्राप्त झाले असून देणगी कक्षातून सुमारे १ कोटी १० लाख ४९ हजार रूपयांचे दान मिळाले आहे. 

त्याप्रमाणे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून ३५ लाख ३८ हजार तर ऑनलाईन दानाच्या माध्यमातून सुमारे २५ लाख ७६ हजाराचे दान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे धनादेशाद्वारे सुमारे २९ लाख ३९ हजाराचे दान प्राप्त झाले असे एकूण ४ कोटी ५३ लाख ६५ हजाराचे दान मिळाले आहे.

दक्षिणापेटी व देणगी काउंटरच्या माध्यमातून सोन्याच्या रूपाने ४८० ग्रॅम वजनाचे १२ लाख रूपयाचे सोने प्राप्त झाले आहे तर ९ किलो ३५२ ग्रॅम चांदी मिळाली आहे. तसेच परकीय चलनाच्या माध्यमातूनदेखील साईंच्या झोळीत दान आहे. 

अमेरीका, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा एकूण सोळा देशांमधून दान आले आहे. त्यामाध्यमातून ३ लाख ३६ हजाराचे दान साई संस्थानास प्राप्त झाले आहे. जनसंपर्क कार्यालयामार्फत सुमारे ३२ हजार पासेस वितरीत करण्यात आले. त्या माध्यमातून ६८ लाख रुपये मिळाले, असे अग्रवाल यांनी सांगितले..

साईसंस्थानकडे आजमितीस १९०० कोटींच्या ठेवी विविध बँकेत जमा असून, ३८० किलो सोने, साडेचार हजार किलो चांदी जमा आहे. आलेल्या दानातून भक्तांना संस्थानमार्फत प्रसादालयात मोफत जेवण, साईनाथ रुग्णालयात मोफत उपचार तसेच साईबाबा रुग्णालयात महागडे उपचार माफक दरात देण्यात येत आहे. 

याशिवाय माफक दरात शैक्षणिक संकूल, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्तांना विविध सुविधा तसेच शहराच्या विकासासाठी संस्थान आर्थिक योगदान देत आहे, असेही रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.