मोहरम सणाच्या वर्गणीसाठी नगरसेवकास खंडणीची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मोहरम सणाच्या वर्गणीकरिता नगरसेवक फयाजोद्दीन शेख यांना आठ ते दहा जणांनी २५ हजार रुपयांची मागणी केली असता त्यांनी स्वखुशीने ७ हजार रुपये दिले. मात्र समाधानकारक पैसे न दिल्यामुळे शेख यांच्या मुलास पळवून नेऊन लाकडी दांडके, काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.३०) दुपारी अडीच ते सोमवार दि.२ ऑक्टोबर दरम्यान कादरी मशिदसमोर व गोविंदपुरा येथे घडली.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबतची माहिती अशी की, नगरसेवक फयाजोद्दीन अजीमोद्दीन शेख यांना शाहीबाज मोहम्मद उर्फ भंगार, शोएब (दोघांचे पूर्ण नाव माहित नाही) व इतर ७ ते ८ जणांनी मोहरमकरिता २५ हजार रुपये वर्गणी द्या असे सांगितले. यावर एवढी वर्गणी देण्यास नगरसेवक शेख यांनी असमर्थता दाखविली आणि स्वखुशीने त्यांनी ७ हजार रुपये वर्गणी दिली.

वर्गणी कमी मिळाल्याने नाराज झालेल्या जमावाने नगरसेवक शेख यांचा मुलगा फरहान याला बळजबरीने शाहीबाज शेख व शोएब यांनी मोटारसायकलवर बसवून मुकूंदनगर, गोविंदपुरा परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या मागील झाडाझुडपात नेले. तेथे त्याचे हात-पाय बांधले आणि त्याला लाकडी दांडक्याने पाठीवर व पायावर बेदम मारहाण केली तसेच खांद्यावर काठीने मारहाण केली आणि नगरसेवक शेख यांना वर्गणीची उर्वरित रक्कम मागितली.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी नगरसेवक शेख यांच्या फिर्यादीवरुन शाहीब शेख उर्फ भंगार, शोएब आणि ७ ते ८ जणांविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कवडे हे करीत आहेत.

अंडा गॅंगपासून संरक्षणाची मागणी.
दरम्यान, या प्रकरणी नगरसेवक फैय्याज यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांची मंगळवार दि. ३ रोजी भेट घेवून अंडा गॅंगपासून मला व माझ्या परिवारास पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर टोळी ही विनाकारण मारहाण करणे, लोकांकडून बळजबरीने पैसे हिसकावून घेणे, महिलांची छेड काढणे, खंडणी मागणे, समाजासाठी घातक पदार्थांची हेरफेर करणे अशी कामे करतात. सदरील गॅंगवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यासह विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून आपल्या व कुटुंबियांच्या जीवास धोका असल्याचे फय्याज यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.