पासपोर्ट मिळवण्यासाठी नगरकरांचे पुण्यात हेलपाटे सुरूच.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर येथील प्रधान डाकघराच्या इमारतीत पारपत्र अर्थात पासपोर्ट कार्यालय सुरू होण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. २१ जुलै रोजी कार्यालयाच्या इलेक्­ट्रीक व संगणक लॅन फिटिंगच्या कामास मान्यता मिळाली असली तरी अद्यापही जिल्ह्यातील नागरिकांना हे कार्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. पासपोर्ट मिळवण्यासाठी नगरकरांचे पुणे येथे हेलपाटे सुरूच आहेत. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

उच्च शिक्षण घेऊन देशाबाहेर जाणाऱ्या नागरिकांना तसेच उद्योगाच्या विस्तारलेली कामे , उच्च शिक्षण , नौकरी व व्यवसायानिमित्त देशाबाहेर जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. मागील २० वर्षांच्या काळात या संख्येचा आलेख वाढत गेला. परदेशवारीसाठी पारपत्र अर्थात पासपोर्ट आवश्यक असतो.

नागरिकांना पासपोर्ट मिळवण्यासाठी पुणे प्रादेशिक पारपत्रक कार्यालयात जाण्याखेरीज अन्य मार्ग नाही. यातून नागरिकांचा वेळ व पैसा अनाठायी खर्च होऊन, पारपत्र मिळवण्यासाठी हेलपाटे घालण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच जिल्हास्तरावर पासपोर्ट कार्यालय असावे, ही मागणी पुढे आली आहे.या संदर्भात निवेदनेही देण्यात आली.

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तारूढ झालेल्या वर्तमान भाजपच्या सरकारने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हास्तरावर पासपोर्ट कार्यालयांना मंजुरी देण्याचे घोषित केले. त्यानुसार राज्यात अहमदनगरसह अन्य ठिकाणी नव्याने पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या. 

तत्कालीन पुणे विभागाचे पारपत्र अधिकारी अतुल गोटसुर्वे, पुणे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्­वरकर यांनी नगर येथे पासपोर्ट कार्यालयाच्या जागेच्या पाहणीसाठी भेट दिली. यावेळी प्रधान डाकघरच्या इमारती मधील दुसदुसऱ्या मजल्याची जागा नगर पासपोर्ट कार्यालयासाठी निश्­चित करण्यात आली. 

दरम्यान, यासंदर्भात २६ मे रोजी पोस्टल स्व्हिहसेसच्या डायरेक्टर सुमित्रा आयोध्या यांनीही नगर येथे या संदर्भात भेट देऊन आढावा घेतला. २१ जुलै रोजी या कार्यालयातील इलेक्­ट्रीक व संगणक लॅनची फिटिंग करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.