आमदार मोनिका राजळेंच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत !

दैनिक पुढारी अहमदनगर :- विधान सभेच्या नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळाच्या संभाव्य विस्तारात नगर जिल्ह्याला राज्यमंत्री पद वाट्याला येऊन आमदार मोनिका राजळे यांचे नाव पक्षीय पातळीवर अग्रक्रमांकावर असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनीही याबाबत सूचक मौन बाळगले आहे.तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या देखील राजळेंचा मंत्री मंडळात समावेश करून घेण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

माजी आमदार स्व.राजीव राजळे यांनी पाथर्डी-शेवगाव मतदार संघात पक्ष बांधणीसाठी विशेष प्रयत्न करत पाथर्डी तालुक्यात पंचायत समिती,तालुका खरेदी विक्री संघ,नगरपालिका,वृद्धेश्वर कारखाना अशा विविध ठिकाणी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.

जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या वजनदार घराणे म्हणून राजळे कुटुंबीयांकडे पाहिले जाते.नगर दक्षिणेत भाजप पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी राजळेंचा मंत्री मंडळात समावेश करून सहकार चळवळीवरही पकड ठेवण्यासाठी राजळेंच्या राजकीय वर्तुळाचा फायदा पक्षाला होऊ शकतो.आमदार बाळासाहेब थोरात, जेष्ठनेते यशवंतराव गडाख अशा दिग्गज नेत्यांचे नातेसंबंध राजळे कुटूंबाशी आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राजळेंच्या ताब्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना गडाख कुटूंबाच्या देखरेखीखाली वाटचाल करणार असून आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते गाळप हंगाम सुरू करून त्यांना सक्रिय करण्याच्या प्रयत्नाचे त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे.पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, पालिकेचे उपनगराध्यक्ष बजरंग घोडके आदी कार्यकर्त्यांसह विविध गावांच्या कार्यकर्त्यांनी मोनिका राजळेंच्या नेतृत्वाला नव्याने झळाळी देण्यासाठी ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्सबोर्ड लक्ष वेधून घेत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.

राजीव राजळे यांच्या निधनानंतर आमदार मोनिका राजळे यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह,ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह विविध पक्षातील आमदार,खासदार,आजी-माजी मंत्री,राज्यातील सर्व पक्षीय नेते यांनी धाव घेत राजळे कुटूंबाचे सांत्वन केले होते. 

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तर दोन दिवस सलग राजळेंकडे आल्या.तालुक्याला सुद्धा स्व.राजीव राजळे यांनी गेल्या १५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत राज्यभर केलेली नेतृत्वाची पेरणी पहायला मिळाली. राजीव यांच्या निधनानंतर मोनिका यांच्या नावाच्या मंत्री पदासाठी गांभीर्याने विचार सुरू झाला.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे खाते बदल झाल्यास त्यांची नाराजी रोखण्यासाठी सुध्दा मोनिका यांच्या मंत्री पदाचा वापर करता येईल,असे डावपेच आखले जात आहेत.आमदार राजळे या पंकजा मुंडे गटाच्या समजल्या जातात.

सांत्वनासाठी आलेल्या पंकजा यांनी शोकाकूल अवस्थेत असलेल्या आमदार मोनिका राजळेंच्या कानात काहीतरी "गुप्तवार्ता" सांगून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.या कान गोष्टींचा संबंध मंत्री पदाशी जोडला जात आहे.

उत्तम संवाद व संघटन कौशल्य,सासर-माहेरचा राजकीय वारसा व विविध संस्थांच्या कामकाजांची माहिती स्वच्छ प्रतिमा व सकारात्मक कार्यपद्धती मुळे आमदार मोनिका राजळे पक्षात अजात शत्रू म्हणून ओळखल्या जातात.मंत्री मंडळात भाजपला महिलांचा टक्का वाढवयाचा आहे.आगामी निवडणुकांच्या दृष्टीने व्यूहनितीचा भाग म्हणून भाजप कडून राजळें ना मंत्री मंडळात संधी मिळू शकते,असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.