जनआक्रोशाचे वादळ मोदी सरकारची सत्ता उलथवून लावेल !:


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :काँग्रेसने आज अहमदनगरमध्ये पहिला जनआक्रोश मेळावा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या नेतृत्वात हा मेळावा घेण्यात आला. काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश आणि राष्ट्रीय नेते गुलाबनबी आझाद या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या जनआक्रोश मेळाव्यात अपेक्षेप्रमाणेच सर्वच नेत्यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारवर सडकून टीका केली.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले, '' या मेळाव्यातून उद्याच्या परिवर्तनाचे बीज रोवले जाणार आहे कारण गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फक्त फसवणूकच केली आहे. गेल्या ८ नोव्हेंबरच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे राज्यातला शेतकरी, कामगार, आणि व्यापारीही उध्वस्त झालेत. गेल्या ३ वर्षात ९ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या, २० हजार मुले कुपोषणाने मृत्यूमुखू पडली, तरीही हे सरकार नुसतचं जाहिरातबाजीत मश्गुल आहे.''
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, '' या भाजप सरकारने राज्याला आणि देशाला देशोधडीला लावलंय. त्यामुळे त्यांच्या परतीचा प्रवास नांदेड पासुन सुरु झालाय, आता मतदारच या देशाला भाजपमुक्त करणार यात शंका नाही, तसंच राज्यातील सरकार हे फडणवीस सरकार नसून फसवणूक सरकार आहे. कर्जमाफी नाही, शेतमालाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांनी जायचं कुठे हेच कळत नाही, सोशल मिडीयावरुन सरकारविरोधात व्यक्त होणाऱ्या तरूणांना पोलिसांकडू दमबाजी केली जातेय. हा प्रकार म्हणजे एकप्रकारे तरुणांचा आवाज दाबण्याचाच प्रकार आहे,'' जीएसटी चुकीच्या पद्धतीने राबवल्यामुळे व्यापारीही अस्वस्थ असल्याचंही चव्हाणांनी म्हटलंय. नोटबंदीचा निषेध म्हणून काँग्रेस ८ नोव्हेंबर हा काळा दिवस मानणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.