कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महावितरणने शेतकर्‍यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची चालू केलेली अन्यायकारक मोहिम तातडीने थांबविण्याची मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत यांना देवून, गंभीर बनत चाललेल्या या प्रश्‍नाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष किसनराव लोटके, युनुस शेख, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, गहिनीनाथ (दादा) दरेकर, रेशमा आठरे, निर्मलाताई मालपाणी, अशोक कोकाटे, संजय कोळगे, कपिल पवार, अमोल जाधव आदि उपस्थित होते.

मागील पाच वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहे. चालू वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून, यामुळे शेतकरी आनंदात आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने पिकांचे नुकसान झाले. परिणामी खरीप पीक वाया गेला. परंतू शेतकर्‍यांनी न डगमगता रब्बी हंगामच्या पीकांची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत महावितरण विभागाकडून थकित कृषीपंपाच्या वीज बीलाची पठाणी वसुली करण्यात येत आहे. 

महावितरणने वीजबिल वसुलीसाठी रोहीत्राचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम जिल्ह्यात सुरु केली आहे. यामुळे शेतकर्‍यांची रब्बी हंगामातील पीके धोक्यात येवून, शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. खरीप हंगाम वाया गेला असताना शेतकरी अडचणीत सापडला असून, महावितरण विभागाने शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीज कट करण्याच्या मोहिमेमुळे पुन्हा शेतकर्‍यांवर सुलतानी संकट घोंगावत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
मुळातच महावितरण कडून कृषीपंपाचे वीजबिल वेळेवर मिळत नाही. परिणामी वीजबिल थकित होते. वसुलीकरिता जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीतून सावरत असून, शेतकर्‍यांकडे वीजबिल भरण्यासाठी सध्या पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने वीजबिल भरणे कठिण झाले आहे. 

महावितरणने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकर्‍यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेतकर्‍यांच्या विहीर, कुपनलिकेत पाणी उपलब्ध असून देखील वीजेअभावी शेतीचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. तरी महावितरणने शेतकर्‍यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम त्वरीत थाबविण्याची व ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित केला आहे तेथे वीजपुरवठा तातडीने सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.