परदेश दौर्यासाठी राजकीय शेतकरी.! शेतकरी बंधावांतून संताप व्यक्त.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यामध्ये कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण आणि परदेशी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी परदेशी अभ्यास दौर्याचे आयोजन कृषी विभाग करतो. मात्र, या दौर्यातून जमिनीत कष्ट करणाऱ्याऐवजी बंधाकडे फिरकत नसलेल्या आणि ‘राजकीय शेती’ करण्यात पुढाकार असलेल्यांचीच वर्णी लागते. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळातील हीच चुकीची परंपरा भाजपाच्या राज्यातही कायम असल्याचीच शेतकरी बांधवांची भावना आहे. कारण यंदाच्या यादीतही पहिल्या २५ जणात अशाच राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा आहे. याचीच चौकशी करून नगर जिल्ह्याची यादी निकषामध्ये करण्याची मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन चोभे यांनी मंगळवारी (दि. ३१ ऑक्टोबर) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांना याबद्दल निवेदन दिले आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप गेरंगे, निलेश चोभे, महादेव गवळी, संतोष वाघ, विशाल विधाटे आदी उपस्थित होते. 

याच निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पाठवून दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, एकूणच राज्यात सरकारचा फ़क़्त सरकारचा चेहरा बदलला आहे. प्रशासन आणि त्यांची कार्यपद्धती यात बदल झालेला नसल्याचेच यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
कारण कॉंगेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळातही अशाच पद्धतीने राजकीय शेती फुलाविनार्या आणि सोसायटी, जिल्हा बँक व बाजार समित्यांतून शेतकरी बांधवांची पिळवणूक करणाऱ्यांनाच परदेशी किंवा परराज्यातील दौर्यांत संधी दिली जात होती. 

आता मुख्यमंत्री जरी पारदर्शक कारभाराचा दावा करीत असले तरीही शेतकरी लाभार्थी निवडीचे निकष धाब्यावर बसविण्याची परंपरा अजूनही कायम आहे. त्यामुळेच नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन या यादीबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकरी बांधवांचे समाधान करावे. 

तसेच याबद्दलचे निकष विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर करावे. यात कोणत्याही प्रकारे अनियमितता किंवा जाणीवपूर्वक चूक केलेली असल्यास संबंधीत जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.