मला आमदारकी कशी करायची ते शिकवू नये - आ. कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मी सर्वसामान्‍य माणसांची नाळ जोडून त्‍यांचे प्रश्‍न जाणून घेऊन त्‍याची सोडवणूक करणारा आमदार आहे. त्‍यांच्‍यामुळे सर्वसामान्‍य जनतेने गेली २५ वर्षे मला आमदारकी दिली आहे. ज्‍यांनी पूर्वजांनी सुरू केलेल्या संस्‍था बंद पाडल्‍या, त्‍या संस्‍थेच्‍या माध्‍यमातून मलिदा लाटला त्‍यांनी आम्‍हाला आमदारकी कशी करायची याची अक्‍कल शिकवू नये. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
त्‍यांच्‍याकडे २५ वर्षे आमदारकी होती, त्‍यावेळी त्‍यांनी आमदारकीच्‍या माध्‍यमातून काय केले हे जनता जाणून आहे, अशी खरमरीत टीका आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे.तालुक्‍यातील तमनर आखाडा येथील पंडित नेहरू सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन समारंभ नुकताच आ. कर्डिले यांच्‍या हस्‍ते मारूती मंदिर येथे पार पडला.

यावेळी आ. कर्डिले यांनी माजी आ. प्रसाद तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्‍या टिकेला चोख उत्तर देताना सांगितले की, सभा मंडप देऊन व दहावे करून तालुक्‍याचा विकास करता येत नाही, अशी टीका आमच्‍यावर केली गेली आहे. मात्र, सर्वसामान्‍य जनतेशी आमची नाळ जुळली असल्‍याने ग्रामीण भागाचा विकास व्‍हावा यासाठी आम्‍ही नेहमीच सर्वच पातळ्यांवर आघाडीवर राहिलेलो आहे याची जनतेला जाण आहे.

म्‍हणूनच जनतेने आम्‍हाला वेळोवेळी त्‍यांचे प्रश्‍न मांडण्‍यासाठी विधानसभेत पाठविले. बोलण्‍यापेक्षा कामे करण्‍यात आम्‍हाला आनंद वाटतो व आम्‍ही सर्वसामान्‍यांची कामे करतो म्‍हणूनच जनता आमच्‍यावर प्रेम करते. तालुक्‍याची पिछेहाट त्‍यांच्याच काळात झालेली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

मतदारसंघाची दैन्‍ाावस्‍था करून ठेवण्‍यास तेच कारणीभूत आहे. तालुक्‍याचा विकास हेच आमचे ध्‍येय आहे. सामान्‍यांच्‍या सुख-दु:खात सामील होऊन त्‍यांना दिलासा देणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्‍य आहे हे अजूनही त्यांना कळालेले नाही का? असा प्रश्‍न मला पडतो. निवडणूक डोळयासमोर ठेवून नको ते आरोप ते करत आहेत.

यावेळी अध्‍यक्षस्‍थानावरून बोलताना महंत सुमंत हंबीर म्हणाले, पुस्‍तके हा ज्ञानाचा खजिना आहे. ऋषीमुनींच्‍या पदस्‍पर्शाने पावन असलेल्‍या तमनर आखाड्यासारख्‍या दोन हजार लोकवस्‍तीच्‍या गावातील सुमारे ११० तरूण शासकीय सेवेत दाखल झाले, ते केवळ ज्ञानामुळे व अध्‍यात्‍माच्‍या जोरावर. संजय तमनर यांनी लोकांसाठी विशेषत: लोकांसाठी त्‍यांच्‍या ज्ञानात भर पडावी म्‍हणून वाचनालयाची सुरू करून दिलेली व्‍यवस्‍था ही उल्‍लेखनीय असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.यावेळी विक्रम तांबे, वैशाली नान्‍नोर, अण्‍णासाहेब बाचकर, शिवाजी बाचकर, नारायण तमनर आदींची भाषणे झाली. 

प्रास्‍ताविक प्रा. संजय तमनर यांनी केले. आभार सखाराम महाराज पिसे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्‍वीतेसाठी गणेश चितळकर, कोंडीराम चोरमले, लक्ष्‍मण बाचकर आदींसह सर्व संचालक व तमनर आखाडा ग्रामस्‍थांनी मोठे प्रयत्‍न केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.