श्रीगोंद्यात भाजप सरकारला घरचा आहेर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील कष्टकरी व कर्जाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर सरकारकडून होणारी हेळसांड थांबवावी. शेतकरी वर्गाच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. यासाठी आज भाजप नेते राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा शहरातील शनिचौकात रास्तारोको आंदोलन केले.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
श्रीगोंदा तालुक्यातील कर्जाने ग्रासलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडाला या भाजप सरकारने पाने पुसली आहेत. शेती मालाला कोणताही हमी भाव नाही त्यामुळे शेतकरी पुरता गुदमरला आहे. त्यामुळे या सरकारची मरगळ काढण्यासाठी म्हस्के यांनी हे आंदोलन केले.

आंदोलनात त्यांनी माळढोक अभयारण्यातील संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात याव. संपूर्ण कर्जमाफी व्हावी. गायीच्या दुधाला किमान ३५ तर म्हशीच्या दुधाला किमान ५० रूपये दर मिळावा तसेच शेती उत्पादनाला स्वामिनाथन आयोगाच्या सूचनेप्रमाणे उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळावा, वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीला प्रतिहेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई मिळावी. 

तसेच विजेचे भारनियमन रद्द व्हावे. वसुलीसाठी रोहित्र सोडू नयेत, तसेच जेष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन ६ हजार मिळावी. उसाला कमीत कमी ३५०० रूपये दर मिळावा, तसेच तालुक्यातून जाणाऱ्या घोड कुकडी पाटबंधारे विभागाने पाणी वाटप वेळापत्रक जाहीर करावे. या मागण्यांसाठी आज रास्ता रोको करण्यात आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

या मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार गायकवाड यांना दिली. या आंदोलनात अनेक गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलना दरम्यान पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान आज सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन केलेले राजेंद्र म्हस्के हे भाजपचे जुने नेते आहेत. परंतु त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज हे आंदोलन करून भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकारविरोधात संघर्ष सुरू राहणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.