जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची जोडणी तोडली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महावितरणाच्या वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषीपंप धारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना' जाहीर केली आहे. या योजनेमुळे वीजबिलांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकीचे पाच समान हप्त्यात थकबाकी भरण्याची संधी राज्य शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेची घोषणा नुकतीच वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांचे कृषीपंपांची जोडणी तोडण्यात आली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या योजनेत तीस हजारांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या मूळ रकमेचे पाच समान हप्ते करण्यात आले तर ३० हजारांपेक्षा अधिक असलेल्या ग्राहकांना मूळ थकबाकीचे दहा समान हप्त्यात भरणा करावयाचा आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीज बील नोव्हेंबरपर्यंत भरून डिसेंबरपासून मूळ थकबाकीपैकी २० टक्याचा पहिला हप्ता थकबाकीदार शेतकऱ्यांना भरावा लागेल, त्यानंतर मार्च २०१८ मध्ये २० टक्के, जून २०१८ मध्ये २० टक्के, सप्टेंबर २०१८ मध्ये २० टक्के व डिसेंबर २०१८ अखेरीस २० टक्यासह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

या योजनेत सहभागी न होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांचे कृषीपंपांची जोडणी तोडण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. महावितरणाच्या कारवाई नंतर काही शेतकऱ्यांनी वीज बिले भरण्याची तयारीही दर्शविण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा निश्चित या शेतकऱ्यांना लाभ होईल, असे महावितरणाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.