चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे मंगळवार दि. २४ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मनीषा आप्पा धेंडे या ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना आढळला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मनिषा हिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र तिच्या पतीनेच खून केल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत मनिषाचा दि. २४ रोजी मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला होता. तेव्हा आरोपींवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह विहिरीतून बाहेर काढू देणार नाही अशी भूमिका मयत मनिषाच्या माहेरच्या लोकांनी घेतली होती. पण श्रीगोंदा पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळत जमावाला शांत करून मयत मनिषाचा भावाच्या फिर्यादीवरून मनिषाचा पती व दोन नंदा अशा तिघांच्याविरोधात मनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून आप्पा शिवराम धेंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना सदर महिलेची आत्महत्या नसून खून असल्याबाबत काही लोकांनी संशय व्यक्त केला. त्यावर पोवार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली आणि दि.२९ रोजी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी पती आप्पा याला पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी आप्पा धेंडे याने पत्नी मनीषा हिचा खून केल्याची कबुली दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

मनीषा हिचा आप्पा यांच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. दोघांच्या विवाहाला पाच वर्षे झाली होती, परंतु आप्पा हा लग्न झाल्यापासून काही कामधंदा करत नव्हता. दारू पिऊन पत्नी मनिषाला तो मारहाण करायचा. तसेच मनीषा ही दिसायला सुंदर असल्यामुळे तिच्यावर तो नेहमी संशय घ्यायचा व तिला मारायचा. 

रविवार दि. २२ रोजी मनीषा व आप्पा हे दोघेच घरात असताना मनिषाच्या मोबाईलवर मिस कॉल आला. त्यावर मनीषा फोनवर बोलू लागली. त्यामुळे मनीषा व आप्पा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले व आप्पा याने मनिषाच्या भावाला फोन करून मनिषाला माहेरी घेऊन जा असे सांगितले. परंतु तिला न्यायला कोणी आले नाही. त्याच दिवशी सायंकाळी मनिषा व आप्पा यांचे पुन्हा भांडण झाले. 

तेव्हा मनीषा हिने स्वताच्या अंगावर रॉकेल ओतून घेत मी मरते अशी आप्पाला धमकी दिली. त्यावर आप्पाला राग आला व त्याने तु कशाला मरतेस मीच तुला मारतो असे म्हणत रागाने मनिषया हिचा गळा दाबला. त्यात मनीषा मृत पावली व त्यानंतर आप्पाने मनिषाचा मृतदेह उचलून नेऊन घराशेजारच्या विहिरीत फेकला आणि मनिषाने आत्महत्या केल्याचा बनाव केला.

हा सगळा घटनाक्रम आरोपी आप्पा याने तपासात पोलिसांना सांगून पत्नी मनीषा ही सतत माहेरी जायची व फोनवर बोलायची, त्यामुळे आपल्याला संशय होता आणि त्या रागातूनच सदर खून केल्याची त्याने कबुली दिली आहे. पोलिसांना सदर खुनाच्या गुन्हाचे पुरावे मिळाल्यामुळे आरोपी आप्पा शिवराम धेंडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश कांबळे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.