सरकारने ग्रामीण भागाला स्वतंत्र पॅकेज द्यावे - बिपीन कोल्हे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील आमदारांच्या वाढत्या संख्येमुळे मुलभूत सुविधांसाठी शहरांना निधीसाठी झुकते माप दिले जाते. त्याचवेळी या सुविधांपासून ग्रामिण भागाला वंचित ठेवले जाते. यामुळे शहरं आणि गावं यांच्यातील दरी वाढली आहे. शेतकरी, कष्टकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा ग्रामीण जनतेचा उद्रेक होईल. तो टाळण्यासाठी ग्रामीण भागाला स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करून संजीवनी कारखाना उसाला जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरीने भाव देईल, अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.

संजीवनी कारखान्याच्या ५५व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, संचालक भास्करराव भिंगारे, झुंबरबाई भिंगारे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, कारखान्याचे सर्व संचालक, कामगार नेते मनोहर शिंदे, माजी सभापती मच्छिंद्र टेके, विविध संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते रविंद्र पाठक, सभासद शेतकरी आदींच्या उपस्थितीत सोमवारी झाला, त्याप्रसंगी कोल्हे बोलत होते. 

बिपीन कोल्हे म्हणाले, ऊसाच्या गाळपावरच तालुक्याचे आर्थिक चक्र अवलंबून आहे. देशात महाराष्ट्र सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य होते; पण ती जागा आता उत्तर प्रदेशने घेतली आहे. त्यांचे एकरी उत्पादन व उताराही सर्वाधिक आहे. साखर उद्योग हा ग्रामीण अर्थकारणाचा मुख्य कणा आहे. गेल्या हंगामात उसाच्या कमतरतेमुळे संजीवनी पूर्ण क्षमतेने चालू शकला नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

मिळेल तो ऊस गाळप केल्याने ९ टक्के इतका रिकव्हरीचा ऐतिहासिक निचांक झाला. वाहतूक खर्च वाढला. भुसा वाढल्याने कोळसा वापराचा भुदंर्ड सहन करावा लागला. केमिकल, डिस्टिलरी, बायोगॅस, को-जनरेशन बंद राहिले. परिणामी २६ कोटींचा तोटा झाला. चालू वर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड वाढवून कारखान्याला स्वयंपूर्ण करावे. साखरेचे भाव वाढले, की शहरातील प्रसारमाध्यमे त्याचा बाऊ करतात. बळीराजा उपाशी राहतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शंकरराव कोल्हे म्हणाले, रासायनिक उपपदार्थ, सहवीज निर्मिती, आसवनी विभाग, आधुनिकीकरण आदी प्रयोग राबवित संजीवनीचा नावलौकीक राज्यात निर्माण केला आहे. साखर उतारा ऊसउत्पादक शेतकऱ्यांना १०००१ व ८००५ जातीच्या उसाचे बेणे कारखान्यामार्फत पुरविले जात असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करावी. संजीवनी कारखाना चालू वर्षी साडेसहा लाख टनांचे तर पुढील वर्षी सात लाख टन गाळपाचे उद्दीष्ट असून नियोजन आतापासुनच सुरू आहे. शेतकी विभागाने ऊसतोडणीबाबत दक्षता घ्यावी. संजीवनीने यंदा ऊस तोडणीसाठी त्रिस्तरीय पद्धत अवलंबिली आहे. सभासद, शेतकरी, कामगार यांनी कारखान्याचा तोटा भरून काढण्यासाठी सहाय्य करावे, असेही कोल्हे म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.