श्रीगोंद्यात नात्याला कलंक; मामाने पळवली भाच्याची पत्नी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी असणारे पण उपजीविकेसाठी एका मोठ्या शहरात वास्तव्य करणाऱ्या एका मामाने चक्क त्याच्या भाच्याच्याच पत्नीला पळवून आणले. शहरात तो मामा आणि ती महिला (भाचे सून) वास्तव्य करीत होते. 


ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

परंतु त्या महिलेच्या पतीने पत्नी आणि मामा असा अचानक गायब झाल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि पोलीस तपासात हे दोघे मामा आणि त्याची भाचे सून शहरात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. श्रीगोंदा पोलिसांनी या मामाला आणि महिलेला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

याबाबत सविस्तर असे की, मूळचे तालुक्यातील एका गावातील रहिवासी असणारे पण पोटाची खळगी भरण्यासाठी एका मोठ्या शहरात वास्तव्यास गेलेले एक कुटुंब. त्या परिसरातील किरकोळ कामे करवून आपली उपजीविका करत होते. तसेच त्यांची पत्नी आजूबाजूच्या सोसायटीतील घरकाम करत होती. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा संसार सुरु होता. 

दरम्यान काही दिवसापूर्वी या कुटूंबप्रमुखाचा मामा त्यांच्या घरी आला. या मामा व त्याच्या भाच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे तिथे त्या मामाची येजा सुरु झाली. दरम्यान काही काळानंतर भाच्याच्या पत्नीचे आणि या कंस मामाचे प्रेमसंबंध जुळले, आणि एक महिन्यापूर्वी या दोघांनी मिळून सदर शहरातून धूम ठोकली.

अनेक ठिकाणी हे दोघे वास्तव्य करत शेवटी त्यांनी शहरातील एका भागातील खोली भाड्याने घेतली व तेथे हे दाघेजन वास्तव्य करत होते. मात्र सदरच्या कुटुंब प्रमुखास पत्नी व मामा दोघेही मिळून येत नसल्यामुळे त्यांनी ते राहात असलेल्या भागातील पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 

दरम्यान श्रीगोंदा पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून ते जोडपे श्रीगोंदा शहरातल्या एका भागात असल्याची माहिती मिळाली. त्याबातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवताच मामाने सर्व प्रकार पोपटासारखा सांगितला. 

या कारवाईत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव व कर्मचारी सहभागी होते. दिवसभर याप्रकाराबाबत पोलीस ठाण्याच्या परिसरात चर्चेला उधाण आले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.