गोरगरिबांना लवकरच अच्छे दिन येणार : औटी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय जनता पक्षाने अनेक धाडसी निर्णय घेवून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. गोरगरिबांना लवकरच अच्छे दिन येणार असून गरिबांकरीता अनेक कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा त्याचाच एक भाग आहे. या योजनेमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास देखील टळणार असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ सदस्य हेरंब औटी यांनी व्यक्त केले. 

ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

बेलापूर सेवा सस्थेच्या प्रांगणात महाअघाडीच्या वतीने गरिबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस वाटपाचा कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणजीत श्रीगोड होते. यावेळी जि.प. सदस्य शरद नवले, नियोजन मंडळाचे सदस्य व नगरसेवक संतोष कांबळे, धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, रज्जाक पठाण, भाऊसाहेब वाघमारे, प्रा. प्रकाश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

जि.प. सदस्य नवले म्हणाले, गरीब कुटुंबाना कमी खर्चात गॅस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भाजप शासनाने घेतला. या शासनाने आनेक महत्त्वकांक्षी निर्णय घेतले आहे. खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी, गावाचा विकास होण्यासाठी थेट ग्रामपंचायतीला निधी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. तसेच जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. शासन अनेक योजना राबवत असून शासकीय अधिकारी अन् गाव पुढाऱ्यांनी त्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावे, असेही नवले म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.