संगमनेर तालुक्यातील समनापूर बनले बिबट्यांचे गाव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील समनापूर खऱ्या अर्थाने बिबट्यांचे गाव बनले आहे. सात दिवसात तीन बिबटे जेरबंद झाले आहेत. काल पुन्हा सोमवार दि. २ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वर्षीय मादी जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. आठ दिवसात एकूण चार बिबटे जेरबंद झाले आहेत. परिसरात अजून बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असल्याने पुन्हा वनविभागाने पुन्हा पिंजरे लावले आहेत. 

ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

समनापूर, कोल्हेवाडी, जोर्वे, पिंपरणे, जाखुरी, कनोली, ओझर, कणकापूर, धांदरफळ, संगमनेर खुर्द, चिखली ही सर्व गावे प्रवरा नदी काठी आहेत. या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. उसामुळे बिबट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. नेहमीच परिसरात बिबटे शेळ्या, मेंढ्या, जनावरे, कुत्रे, लहान मुलांसह मोठ्या माणसांवरही हल्ले करत आहेत.

समनापूर-कोल्हेवाडी परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरांना तारांचे कंपाऊंड करुन घेतले आहे. तरीही बिबट्यांचे हल्ले थांबले नाहीत. बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे सुद्धा अवघड झाले आहे.

आतापर्यंत बिबट्यांनी अनेक लहान मुलांवर व मोठ्या माणसांवरही जीवघेणे हल्ले केले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही अवघड बनले आहे. समनापूर परिसरात असणाऱ्या शाळांनीही तारांचे कंपाऊंड करुन घेतले आहे.

बिबट्यांपासून आपले संरक्षण कसे करता येईल. या संदर्भातही वनविभागाने यापुर्वी परिसरातील लोकांमध्ये जनजागृतीही केली आहे. पण तरीही काहीच उपयोग झाला नाही. समनापूर परिसरात काही दिवसांपुर्वी वनविभागाने बिबटे जेरबंद होण्यासाठी तीन ते चार वस्त्यांवर पिंजरे लावले आहेत. 

आठ दिवसात एक पिंजऱ्यामध्ये चार बिबटे जेरबंद झाले आहेत. थोडयाफार प्रमाणात नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला असला तरी अजून परिसरात बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे वनविभागाने पुन्हा याच ठिकाणी पिंजरा लावला आहे.
समनापूर परिसरातच एवढया मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या कशी काय वाढली असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. एकंदरीतच सध्या तरी समनापूर हे बिबट्यांचे गाव बनले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.