दांडिया खेळताना झालेल्या वादाचा राग मनात धरुन तलवारीने वार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-कल्याण रोडवरील बालाजी मंदिर येथे शनिवारी (दि.३०) रात्री साडेअकरा वाजता नवरात्रौत्सवादरम्यान दांडिया खेळताना झालेल्या वादाचा राग मनात धरुन तलवार, चॉपर, आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी ९ ते १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

याबाबतची माहिती अशी की, शनिवारी रात्री अंकुश लक्ष्मण साबळे आणि स्वप्नील दीपक गडाख (वय २०) हे दोघे मंदिराच्या पायरीवर बसले असताना येथे योगेश गज्जेल्ली (रा. कल्याण रोड), सुमित इपलपेल्ली (रा. तोफखाना), अक्षय वल्लाकट्टी (रा. तोफखाना), सचिन वाळके उर्फ जॉक्सन, सुनील जाधत्त उर्फ दाद्या (दोघे रा. नालेगाव), नील गांधी (रा. झारेकर गल्ली), श्रीकांत येनगुंटला (रा. दातरंगेमळा) यांच्यासह ३ ते ४ अनोळखी इसम मोटारसायकलवरुन आले.

मंदिराजवळ येताच योगेश गज्जल्ली, सुमीत इपलपेल्ली यांनी साबळे व गडाख यांच्या पोटावर तलवारीने वार केले. गडाख याच्या डोक्यात चॉपरने वार केला.तर नील गांधी याने पाठीमागून हात धरुन इतरांनी लाकडी दांडके व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच श्रीकांत येनगुंटला याने साबळेच्या खिशातील तीन हजार पाचशे रुपये बळजबरीने काढून घेत सगळे पसार झाले.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी साबळे याच्या फिर्यादीवरुन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.