भाजप देशामध्ये सर्वात गतीमान वेगाने वाढणारा पक्ष - खासदार गांधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील मध्यनगर भाग भारतीय जनता पार्टीचा पाठिराखा भाग आहे. त्यामुळे कायम मध्यनगर भागातून सर्व निवडणुकांना भाजपला उत्स्फुर्त मतदान मिळत आहे. देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने मोठे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

ज्या पक्षाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे, त्या पक्षाचे तुम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते आहात, याचा अभिमान बाळगा. आज या दोन्ही नेत्यांमुळे देश व राज्य प्रगतीपथावर जात आहे. भारतीय जनता पक्षावर नागरिकांचा मोठा विश्वास वाढत असल्याने देशामध्ये सर्वात गतीमान वेगाने वाढणारा हा पक्ष झाला आहे, असे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले.

नगर शहर मध्यनगर मंडलची नवीन कार्यकारिणी मंडलचे अध्यक्ष तथा माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांनी घोषित केली. नवीन पदाधिकाऱ्यांना शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात गांधी बोलत होते. या कार्यक्रमास उपमहापौर श्रीपाद छिंदम, शहर उपाध्यक्ष नगरसेवक किशोर डागवाले, सरचिटणीस किशोर बोरा, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, आसाराम ढुस, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा आदी उपस्थित होते.

उपमहापौर छिंदम यांनी खासदार गांधी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभाही ताब्यात घ्यायची आहे. विद्यमान आमदार अडीच वर्षात शहराचा कायापालट केला असल्याचे वक्त्वव्य करत आहेत, तर माजी आमदार २५ वर्षांच्या विकासाची वाट लागली आहे, अशी वक्तव्य करत आहेत.प्रत्यक्षात आजी-माजी आमदार जनतेची दिशाभूल करत आहेत, असे ते म्हणाले. 

सुनील रामदासी यांनी पद मिळाल्यांची पक्षाच्या आणि समाजाप्रती जबाबदारी वाढली आहे. पक्षाने मला काय दिले, यापेक्षा मी पक्षाला काय देऊ शकतो. या विचाराने काम केले पाहिजे, असे सांगितले.  नगरसेवक किशोर डागवाले व सरचिटणीस किशोर बोरा यांचीही भाषणे झाली. मध्यनगरचे अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत मुथा यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.