मोहटादेवीच्या भाविकांना लुटणाऱ्या चोरट्याला नागरिकानीं पकडले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्याला धाक दाखवून धायतडकवाडी शिवारात रस्त्यावर लुटणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीला स्थानिक नागरिक व फिर्यादीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केलल्या मोसीम बन्सी शेख (वय-18 वर्षे,रा.अकोला) याला येथील न्यायाधीश डॉ. दत्तराज पटवे यांनी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

यामधील दोन आरोपी फरार झाले आहेत. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कैलास कुंडलिक शिंदे रा. दैठण ता. आष्टी, जिल्हा बीड हे पत्नीसह मोटारसायकवरून मोहटादेवीवरून पाथर्डीकडे येत होते. धायतडकवाडी शिवारात तिघांनी शिंदे यांची मोटारसायकल अडविली. 

रस्त्यावर अडवून धाक दाखवून कैलास शिंदे यांच्या खिशातील रोख तेराशे रुपये काढून घेतले. त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे मणिमंगळसूत्र हिसकावले. या वेळी शिंदे व त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली असता, नागरिकांनी तिघांचा पाठलाग करून एकाला पकडले तर इतर दोघे अंधाराचा फायदा फायदा घेऊन फरार झाले. मोसीम शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

पोलिसांनी शिंदे यांच्या फिर्यादीवरून मोसीम शेख, सचिन बारगजे रा.अकोला, ज्ञानेश्वर धायतडक, रा. धायतडकवाडी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मोसीम शेख याला तपाशी अधिकारी पोलिस हवालदार प्रकाश बारवकर न्यायालयासमोर सोमवारी हजर केले असता, न्यायाधीश डॉ. दत्तराज पटवे यांनी शेख याला चार आक्टोंबर 2017 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस सचिन बारगजे व ज्ञानेश्वर धायतडक यांचा शोध घेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.