सरकार शेतकऱ्यांवर कोणता सूड उगवत आहे ? आ. वैभव पिचड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज कुठलीही पूर्वसूचना न देता वीजवितरण कंपनीने खंडीत केली आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान अकोले तालुक्यात होत असून राज्यातील हे जुलमी सरकार शेतकऱ्यांवर कोणता सूड उगवत आहे? असा सवाल आ. वैभवराव पिचड यांनी केला. चालू बिले भरण्यास परवानगी देवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची जोरदार मागणीही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
वीजवितरण कंपनीचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी, अकोल्याचे उपअभियंता डी.के.बागुल यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत आ.पिचड यांनी ही मागणी केली. यावेळी जि.प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, जि.प. सदस्य रमेश देशमुख, ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊ पाटील नवले, दूध संघाचे संचालक गोरक्ष मालुंजकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ.पिचड म्हणाले, पूर्वसूचना न देता रोहित्र बंद करणे हे बेकायदेशीर असून शेतकऱ्यांना दीड वर्षे झाली तशी अद्यापपर्यंत बिले मिळालेली नाहीत. सर्वप्रथम ही बिले द्यावीत. मग बिले भरू, पण ही फक्त चालू बिले मिळावीत. तीच आम्ही भरू. ३ एचपी-१६७५ रु., ५ एचपी-२८८५, ७.५ एचपी-४२३७, १० एचपी-५६५० तर १२ एचपीला ७५०० रुपये प्रमाणे बिले भरण्यास परवानगी द्यावी. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
अकोले तालुका हा आदिवासी डोंगराळ व दुर्गम भाग आहे. गेल्या तीन वर्षापासून शेतीमालाला भाव नाही. सरकारची शेतकरी विरोधी धोरणे यामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. शेती कर्जमाफीचे तिनतेरा वाजले आहेत. ते पैसे अजून शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाहीत. हे पैसे आले की, विज बिल थकबाकी भरू. 

हे सरकार रातोरात फतवे काढून रोहित्र बंद करते, हा कुठला न्याय? ही कारवाई जुलमी आहे. ज्या रोहित्रावर अनेक वीज जोडणी असते, त्यातील काहीजण विज बिल भरतात, काही भरत नाही, पण रोहित्र मात्र बंद केले जाते. बंद रोहित्र तातडीने सुरू करा, अन्यथा तीव्र तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही आ. पिचड यांनी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.