जागेच्या वादावरुन बाप-लेकास मारहाण,आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहत्या जागेवरील भिंतीच्या वादावरुन बाप-लेकास लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एजाज खान ईस्माईल खान पटेल (वय ५१, रा, झंेडीगेट, नगर) हे शनिवार, दि. २८ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभे असताना जागेच्या भिंतीच्या वादावरुन त्यांना व त्यांच्या मुलाला शेख सुबेदार नसरुउद्दीन निजामउद्दीन, शेख सुबेदार अल्लाउद्दीन निजामउद्दीन, शेख सुबेदार अमिनउद्दीन निजामउद्दीन, शेख सुबेदार अजरुद्दीन नसरुउद्दीन, शेख सुबेदार अल्तमश अल्लाउद्दीन, शेख सुबेदार अलीरजा अमीनउद्दीन, शहिद खान पटेल, शेख सुबेदार अफशान नसरुउद्दीन (सर्व रा. झेंडीगेट)यांनी लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
यातील शेख सुबेदार अलीरजा हा पटेल यांच्या अंगावर तलवार घेवून धावून गेला व त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पटेल यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई बोडखे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.