भाजप सरकारच्या काळात राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भाजप सरकारच्या काळात राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. 'जीएसटी' आणि नोटबंदी सारखे निर्णय लादले जात आहेत. राज्य सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत नसल्याचे सांगत, सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
'नागवडे' कारखान्याचा ४४व्या गाळप हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, घनशाम शेलार, उपनगराध्यक्षा अर्चना गोरे, बाळासाहेब गिरमकर, प्रेमराज भोयटे, जिजाबापू शिंदे, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, भगवान गोरखे, सोपानराव थिटे, सुरेखा लकडे, अंजली रोडे, राजकुमार पाटील, योगेश भोयटे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये मंत्र्यांना बोलण्याचीही मुभा नाही, शासनाचा कारभार 'वन मॅन आर्मी' असा केंद्रित आहे. सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकरी कर्जमाफी करण्याची घोषणा केली, मात्र कर्जमाफी नक्की कोणत्या दिवाळीला देणार आहेत ? असा उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, पंजाब सारख्या बागायत भागात कर्जमाफी केली जाते, मात्र महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री कर्जमाफी का करू शकत नाहीत ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
तसेच नऊशे कोटींच्या कर्जमाफीचा फार्स करून सरकार नागपूर अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत आहे. 'जीएसटी' सारख्या जाचक करांमुळे शेतकऱ्यांपाठोपाठ आता व्यावसायिकांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तीन वर्षे राज्यात दुष्काळी परिस्थिती होती, यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. तर आता सरकारने वीजजोड तोडण्याचे पातक सुरू केले आहे. साखर उद्योगात देखील साखर विकणारे आणि घेणारे दोघांवरही साठ्याबाबत निर्बंध लादल्याने अनेक निर्माण झाल्या आहेत. 

राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे म्हणाले, साखर कारखान्यांवर प्रदूषण मंडळ सतत नवनवीन अटी लादत आहे. साखर निर्यातीला सरकारने परवानगी दिली आणि अचानक बदलली. थेट साखर आयातीचा निर्णय घेऊन साखरेचे भाव कमालीचे उतरवले. परिणामी कारखान्यांचे साखर निर्यातीचे अनुदान देखील रखडले आहे. सहकारी साखर धंदा अडचणीत आणला जात असल्याचा आरोप नागवडे यांनी यावेळी केला. ते म्हणाले, सरकारने प्रत्येक शेतकऱ्याचे ५०% वीजबिल माफ करावे आणि उर्वरित बिलाचे टप्पे पाडून द्यावेत. 

कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, राज्य सरकार सतत निर्णय बदलून शेतकऱ्यांच्या दु:खावर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. काहींनी काटा पेमेंट देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांनी शेतकऱ्यांचाच काटा करू नये. असे म्हणत नागवडे यांनी नामोल्लेख टाळून पाचपुते यांना चिमटा घेतला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.