राज्याच्या सिंचन विकासास प्राधान्य - केंद्रियमंत्री नितीन गडकरी​

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाणी हाच विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदु आहे. देशातील रखडलेले 350 सिंचन प्रकल्प पुर्ण करण्याचे केंद्रशासनाने ठरविले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून, लवकरच 50 प्रकल्प हाती घेतले जातील. अशी माहिती केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन व जलसंपदा नदीचा विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
राज्याच्या सिंचन विकासासाठी केंद्रशासनाकडुन भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. कौठे मलकापूर, (ता. संगमनेर) येथे युटेक शुगर या नव्याने सुरु झालेल्या कारखान्याच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी केंद्रियमंत्री श्री. गडकरी बोलत होते. 

यावेळी ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण व राजशिष्‍टचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार प्रविण दरेकर, माजीमंत्री बबनराव पाचपुते, श्याम जाजू, युटेक शुगरचे संस्थापक रविंद्र बिरोले आदी उपस्थित होते. 

श्री. गडकरी म्हणाले, ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. इस्त्राईल देशात पाण्याच्या नियोजनामुळे शेतीतून संपन्नता आली आहे. आपल्याकडेही याच पद्धतीने पाणी नियोजन केले तर नक्कीच संपन्नता येईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांसाठी 6 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून नदी, नाले खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांना गती मिळणार आहे. गावपातळीवर पाणी नियोजन आवश्यक असल्याचे सांगतानाच गावात पाणी आलं की, गावं बदलतात, पाण्यामुळे संपन्नता येते, गरीबी दूर होते व रोजगारही उपलब्ध होतो. अशी अनेक जलसमृद्ध गावे राज्यात आहेत. शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग केले पाहिजेत. 

रविंद्र बिरोले या सामान्य तरुणाने माळरानावर सुरु केलेल्या या उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल व या भागात संपन्नता येईल. ऊस लागवडीसोबतच बांबु लागवड करा, यातून पर्यांवरणाच्या संवर्धनासोबतच वीजनिर्मिती करणे शक्य होईल. ऊस लागवड करतांना तसेच पाणी नियोजन करतांना ठिबकचा वापर करा, असा सल्ला श्री. गडकरी यांनी यावेळी दिला. 

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात ‍ठिबक सिंचनाला प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे. साखर उद्योगावर आधारीत उद्योगांना बळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगतानाच सामान्य कुटुंबातील तरुणांने मोठ्या संघर्षातून उभा केलेला उद्योग या भागासाठी वरदान ठरेल. 

पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस लागवड क्षेत्रातही वाढ होईल. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना ऊस हे शाश्वत पीक वाटते. ऊस कारखानदारीमुळे रोजगार निर्मिती वाढली आहे. प्रत्येकाने पाणी नियोजन करणे गरजेचे असून, युटेक शुगर या नव्याने सुरु झालेल्या कारखान्याने पाण्याचे नियोजन कसे करावे, याचे मॉडेल उभे करावे, असे त्यांनी सांगितले. संचालिका आश्विनी बिरोले यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.