आमदार मुरकुटे यांच्या हट्टापोटी गडकरींनी नाकारला जुन्या मित्राचा पाहुणचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज शिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. विशेष काहीही भाष्य न करता ते शिर्डीकडे गेले. यादरम्यान त्यांना जुने मित्र, शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे प्रमुख यशवंतराव गडाख यांचा पाहुणचार टाळावा लागला. कारण दोन दिवसांपासून नेवासे मतदारसंघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी या भेटीला विरोध केला होता. अखेर आमदारांच्या विरोधामुळे गडकरी यांनी जुन्या मित्राचा पाहुणचार नाकारला. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शिर्डी येथे जाण्याआगोदर गडकरी यांनी शिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. या दौऱ्यादरम्यान यशवंतराव गडाख यांचे पुत्र, मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी गडकरींच्या स्वागताचे नियोजन केले होते. गडाख यांनी सोनई येथील अंबराईत गडकरी यांच्या पाहुणचाराची खास व्यवस्था केली होती. पण या भेटीत आमदारांची माशी शिंकली. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दोन दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री आदींना फोन करून गडकरी यांनी गडाखांच्या घरी जाऊ नये, अशी मागणी केली.

कारण आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे भाजपला अडचणी येणार आहेत. गडकरी गडाखांच्या घरी गेल्यास वेगळा संदेश जाईल, त्याचा फटका भाजपला बसेल, असे आमदार मुरकुटे यांनी वरिष्ठांना पटवून दिल्याचे समजते.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
दोन दिवसांपूर्वीच्या नियोजनात गडकरी गडाखांकडे जातील, असे नमुद केले होते. तथापि, आमदाराच्या हट्टापोटी ही भेट घेण्याचे काल उशिरा रद्द करण्यात आली. त्यामुळे नाइलाजाने मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी शिंगणापूर येथे जाऊन गडकरी यांना यशवंतराव गडाख यांचे पुस्तक भेट देऊन सत्कार केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.