'महावितरण'च्या तुघलकी कारभाराविरूद्ध शेतकरी संघटना मैदानात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वीजबिलाच्या थकबाकीचे कारण देत महावितरण कंपनीने शेतकरी ग्राहकांना छळण्यास पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. अशा पद्धतीने ही कंपनी बेकायदेशीररित्या तुघलकी पद्धतीने त्रास देत असल्याने शेतकरी संघटना राज्यभर याविरोधात तीव्र आंदोलन पुकारत आहे. सोमवारी (दि. ३० ऑक्टोबर) श्रीरामपूर येथील कार्यालयात धरणे आदोलनाने यास सुरूवात होत आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
श्रीरामपूर येथील आंदोलनाची माहिती देताना उत्तर जिल्हाध्यक्ष बापुराव आढाव म्हणाले की, संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्यासह महिला आघाडीच्या सीमाताई नरवडे व दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन चोभे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी श्रीरामपूर महावितरण कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
कार्यकारी अभियंता शरद बंड यांच्याकडे शेतकरी व ग्राहकांची बाजू मांडली जाणार आहे. कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता कंपनी अशा पद्धतीने विद्युत रोहित्र किंवा वीज कनेक्शन काढू शकत नाही. किमान १५ दिवस अगोदर याबाबतची नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यामुळेच शेतकरी ग्राहकांचे कंपनीने लाऊडस्पिकरवरून उगीच त्रास देऊन मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करू नये.

कंपनी ब्रिटिशांच्या मनोवृत्तीची : सचिन चोभे
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सचिन चोभे म्हणाले की, ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच 'महावितरण'चा कारभार सुरू आहे. बेकायदेशीररित्या ग्राहकांना त्रास देण्याची ही पद्धत आहे. याविरोधात फक्त आंदोलन न करता कंपनीला त्यांच्याच स्टाईलने संघटना उत्तर देईल याचे भान वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठेवावे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.