विखे पाटलांचा 'लाल दिवा' जाणार ? विरोधीपक्षनेता पदावर राष्ट्रवादीचा 'डोळा' !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा ठोकणार असून राष्ट्रवादीचा सद्या या पदावर डोळा असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्राने अहमदनगर लाईव्हशी बोलताना दिली आहे.विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद हे धनंजय मुंडेंच्या रुपाने राष्ट्रवादीकडे आहे. आता विधानसभेतही अजितदादांच्या रुपाने विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी त्यांनी जोरदार कंबर कसली आहे. 

फाईल फोटो राधाकृष्ण विखे पाटील
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

विधानसभेत काँग्रेसचे 42 आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत. केवळ एक सदस्य जास्त असल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळविले होते.

मात्र आता नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून, विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक व पुत्र आ. नीतेश राणे आणि कालिदास कोळंबकर हेदेखील लवकरच काँग्रेसच्या आमदारकीचे राजीनामे देऊन राणे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ कमी होणार आहे. 

अजितदादांनीच लावली जोरदार फिल्डिंग  
काँग्रेसपेक्षा एका सदस्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त ठरत असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा सांगणार आहे. या पदासाठी अजित पवार यांचे नाव पक्षप्रमुख शरद पवार यांनीच पुढे केले आहे. त्यामुळे लवकरच अजितदादा पवारांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळणार असून, विरोधी पक्षातूनही दादा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा घेणार आहेत. त्यासाठी खुद्द अजितदादांनीच जोरदार फिल्डिंग लावली आहे. 

ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

मुख्यमंत्र्यांसोबतची 'जवळीक' नडणार ???

राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वीच भाजपात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिर्डीतील कार्यक्रमात विखे यांनी फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळतानाच, ‘गेल्या सरकारमधील मंत्र्यांपेक्षा आताचे लोक मला जवळचे वाटतात,’ अशी जाहीर भूमिका मांडली होती.

भविष्यात काहीही घडू शकते !
विखे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीची कबुली देत मुख्यमंत्री फडणवीस ही म्हणाले होते , ‘राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमच्या पक्षात मित्र अधिक आणि स्व-पक्षात शत्रूच अधिक आहेत. आम्ही दोघे मिळून विकास कामे करतो. त्यात राजकारण आणत नाही. विरोधी पक्षनेते माझ्याकडे कधीच चुकीचे काम घेऊन येत नाहीत. आम्ही दोघे विकासावर उत्तम काम करतो. भविष्यात काहीही घडू शकते,’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विखे यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले होते.

मुख्यमंत्री फडनवीस यांची तारांबळ उडणार !
अजित दादा विखेंसारखे फडणवीस यांच्याशी जुळवून घेणारे नाहीत. त्यामुळे अजितदादांचा सामना करताना फडणवीस यांना बराच राजकीय तारांबळ उडणार आहे.सद्या काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद आहे. परंतु, त्यांनी विरोधात राहूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले होते.

ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

अजित दादांचे विशेष लक्ष 
राज्यातील राजकीय घडामोडींवर अजित पवारांचे बारकाईने लक्ष आहे. समजा नीतेश राणेंनी राजीनामा दिला नाही आणि केवळ कोळंबकर यांनीच राजीनामा दिला तरी काँग्रेस व राष्ट्रवादीचे समसमान संख्याबळ होईल. 

राज्याचा विरोधी पक्षनेता राणेसाहेब ठरवतील !
अशा परिस्थितीत विधानसभेचे सभापती विरोधी पक्षनेता ठरवतील. तरीही नीतेश राणे यांनी नुकतेच पुणे येथे एक विधान केले होते. ते म्हणाले होते की राज्याचा विरोधी पक्षनेता राणेसाहेब ठरवतील. त्यामुळे राणे व पवारांचे असलेले राजकीय सौख्य पाहाता विरोधी पक्षनेतेपदाची संधी राणे हे नक्कीच अजित पवारांना देतील.

ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

विखे हे भाजपचे हस्तक : अशोक विखे
विखे पाटील आणि भाजप यांच्या नात्याबाबत थेट आरोप त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे-पाटील यांनी केला होता.विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) हस्तक आहेत,तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी खरे तर शेतकरी संपाला पाठिंबा द्यायला हवा होता; मात्र, त्यांनी संप फोडण्याचा प्रयत्न करून सरकारलाच मदत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप डॉ. अशोक विखे यांनी केला होता.

राज्यभर काँग्रेसला घरघर लागली
आधीच राज्यभर काँग्रेसला घरघर लागली आहे. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, अशा बड्या नेत्यांचे किल्ले उदध्वस्त होत आहेत. काही शेवटच्या घटका मोजत आहेत.स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही काँग्रेसची सर्वांत निच्चांकी पडझड म्हणता येईल. त्यामुळे काँग्रेसजन भेदरले आहेत.

विखे पाटीलही बालेकिल्ल्यात ही पडझड रोखू शकलेले नाहीत.
विरोधी पक्षनेते हे जबाबदारीचं पद असलेले विखे पाटीलही त्यांच्या बालेकिल्ल्यात ही पडझड रोखू शकलेले नाहीत. काँग्रेस नेतृत्व प्रभावहीन ठरतंय, ही चर्चा खुद्द काँग्रेस पक्षात उघडपणे सुरू झाली आहे. त्यातलं एक बोट विखे पाटलांकडेही रोखलेलं आहे.

ADVT - खरेदी करा ५० लाखांहून अधिक भारतीय वापरत असलेला Mi Note 4 स्मार्टफोन फक्त ९९९९ मध्ये फ्लिपकार्ट वर अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/MjkLo!NNNN

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातली खदखद आता नेत्यांच्या दिशेनं
थोरात यांनीच विखे यांचं नेतृत्व अडचणीचं आणि स्वपक्षीयांचा घात करणार आहे, असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी केलं होतं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातली खदखद आता नेत्यांच्या दिशेनं जाईल, यामुळे काँग्रेस नेते घाबरले आहेत. विखे यांचं या घाबरलेल्या नेत्यांत सर्वांत पुढे असणं स्वाभाविक आहे. कारण ते विरोधी पक्षनेते आहेत.

घरातला एका लाल दिवा जाणार ???
नगर जिल्हय़ातील राजकारणात विखे याचे नाव असुन अनेकांना लाल दिवा हुलकावणी देत असतो मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे हे पती पत्नी लाल दिव्याच्या गाडीत बसनारे एकमेव आहेत.मात्र आता त्यांचा एक 'लाल दिवा' जाणार हे मात्र नक्की !

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.