पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणूकीसाठी नगर जिल्ह्याचे स्वतंत्र पॅनेल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. विद्यापीठ विकास मंडळ नगर जिल्ह्यासह पुणे व नाशिक येथील उमेदवारांच्या सहकार्याने यंदा स्वतंत्र पॅनेलसह ही निवडणूक लढविणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख सुभाष चिंधे यांनी दिली. 


    


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आज (दि. 27) मंडळातर्फे खुल्या प्रवर्गातून डॉ. भारत करडक व सचिन चोभे यांनी,तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सुभाष चिंधे आणि भटक्या-विमुक्त प्रवर्गातून अमोल खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
पुणे व नाशिक जिल्ह्यातील इतर उमेदवार लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विद्यापीठाचा कारभार प्रशासनाऐवजी विद्यार्थीभिमुख व पारदर्शी होण्याची गरज आहे. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याची गरज आहे. तसेच परिक्षा विभागातील अनागोंदी कारभार संपविण्यासाठी यंदा विद्यापीठ विकास मंडळ ही निवडणूक लढवित आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.