शिक्षण मोफत व सक्तीचे होणे गरजेचे - आ.सुधीर तांबे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिक्षण हे मोफत व सक्तीचे होणे गरजेचे आहे.शासन हे शिक्षणास दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करीत आहे.संच मान्यतेच्या जाचक अटींमुळे शिक्षणाची हेळसांड होत आहे.अनेक संघटनामुळे सरकार गांभीर्याने विचार करीत नाहीत. आज सर्व संघटना एकत्र आल्या. २५ टक्के लोक अडाणी आहेत,त्यासाठी शिक्षणावर लक्ष केंद्रित करा, असे प्रतिपादन आ.सुधीर तांबे यांनी अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५७ वे शैक्षणिक संमेलन शुभारंभ प्रसंगी केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शिक्षण उप संचालक रामचंद्र जाधव यांनी सांगितले की पुणे नाशिक येथे महात्मा फुले गुणवत्ता अभियान राबवीत आहोत.मुख्याध्यापकांनी गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक संशोधनासाठी प्रयत्न करावेत.शिर्डी येथे अधिवेशन प्रारंभ झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळ अध्यक्ष भागचंद औताडे,अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष लालचंद असावा,सचिव रंगनाथ माने यांनी दिली.अधिवेशनाची सुरुवात संमेलनाध्यक्ष जेष्ठ शिक्षणतज्ञ आबासाहेब जंगले यांच्या हस्ते झाली.

सूत्र संचालन सौ संगीता फासाटे,लक्ष्मण महाडिक यांनी केले.या संमेलनात बदलते विचार,प्रवाह,९ वी १०वि पुनर्रचित आभ्यासक्रम शिक्षणातील आव्हाने, शोधनिबंध, वाचन, संगणकीय माहिती,ऑनलाईन नोंदी, प्रचलित मूल्यमापन कार्यपद्धती व मुख्याध्यापाकांच्या न्याय्य मागण्या यावर चर्चा करण्यात आली.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
यावेळी प्रमुखअतिथी आ.सुधीर तांबे,रयत संस्थ उपाध्यक्ष अरुण प.कडू,शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव,संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी,वसंतराव पाटील,नंदकुमार बारवकर,मारोती खेडेकर,भागचंद औताडे,राजेंद्र पिपाडा,शत्रुघ्न बिरकड,एस बी देशमुख,आदींनी मार्गदर्शन केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते ओं साईराम या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.संस्थापक रावसाहेब आवरी यांनी संघटनेची माहिती दिली राज्यातून विदर्भ,मराठवाडा,नासिक,इ ठिकाणाहून मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिवेशनासाठी.अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ,प.महाराष्ट्र श्री भागचंद औताडे,लालचंद असावा एस बी देशमुख,झाकीर सय्यद,सुरेश शेलार,रंगनाथ माने,विश्वनाथ औटी,जानकीनाथ पांढरकर,सर्जेराव मते,दत्तात्रय गोसावी,विलास शिंदे,सोपान विखे,राजेंद्र बर्डे,जी टी गमे,भरत जाधव,मंजुषा काळे,श्रीमती आशाताई कर्डिले,गजानन शेटे,रामनाथ केकाणे,शिवाजी लावरे,गंगाधर पंडित,जी टी जुंदरे,भाऊसाहेब पेटकर,मच्छिंद्र जगताप,आदीनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन राजेंद्र बर्डे यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.