महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक,संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रोहित्रे बंद केल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील शेतक‍ऱ्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काल सकाळी कोल्हार- घोटी महामार्गावर वडगावपान फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडगावफाटा येथे छेडण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनप्रसंगी थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, सुरेशराव थोरात, संपतराव गोडगे, सतिष कानवडे, पांडूरंग घुले, साहेबराव गडाख, मिलींद कानवडे, प्रभाकर कांदळकर, अर्चनाताई बालोडे, निर्मलाताई गुंजाळ, बेबीताई थोरात, पद्माताई थोरात, उपस्थित होते.

या आंदोलनात शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुध्द आक्रमक झाले होते. मनमानी करणाऱ्या अधिका‍ऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केली. त्यामुळे शेतक‍ऱ्यांना आवरताना प्रशासनाची तारांबळ उडाली.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
अ‍ॅड. माधव कानवडे म्हणाले, शेतक‍ऱ्यांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकरी एकवटले आहेत. या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावीच लागेल. रणजितसिंह देशमुख म्हणाले, ग्रामीण भागाची कोणतीही जाण नसलेल्या या सरकारने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा उद्या तालुक्यातील सर्व सबस्टेशनचा शेतकरी ताबा घेतील, असा इशारा त्यांनी दिला. बाबा ओहोळ म्हणाले, सध्याचे सरकार हे शेतक‍ऱ्यांसाठी मोठे सुलतानी संकट आहे. सरकारमध्ये एकही शेतकरी नेता नाही. .

यावेळी भाऊसाहेब कुटे, थोरात, संपतराव गोडगे, निर्मलाताई गुंजाळ, सतिषराव कानवडे, सुरेशराव थोरात, विलास कवडे, पद्माताई थोरात, अर्चनाताई बालोडे, बेबीताई थोरात, प्रभाकर कांदळकर, शिवाजी जगताप, अवधूत आहेर यांची भाषणे झाली.

रास्तारोको आंदोलन सुरु असताना अचानक आलेल्या रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी त्वरीत वाट मोकळी करुन देत संवेदनशीलता व माणूसकीचा धर्म जोपासला.यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. बी. गोसावी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारुन शेतक‍ऱ्यांच्या तीव्र भावना वरिष्ठ पातळीवर पोहचवून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.