कर्जमाफीतून शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी असल्याची ओरड केली जात आहे; मात्र फसलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
घोषणा होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही जमा झालेली नाही. त्यामुळे या सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी नसल्याचे स्पष्ट होत आहे. या फसलेल्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी विखे यांनी यावेळी केली.

नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ना. विखे बोलत होते. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली खरी; मात्र योजनेचा बोजवारा उडाला आहे. 

कर्जमाफीतील शेतकऱ्यांची आकेडवारी सांगता सांगता सरकारची असलेली बौध्दिक दिवाळखोरी जनतेसमोर येत आहे. दिवाळी गोड करण्याच्या नादात प्रमाणपत्र देण्याचा फार्स करण्यात आला; मात्र, प्रमाणपत्र पुन्हा घेण्याची नामुष्की या सरकारवर ओढवली असून या सरकारने कर्जमाफीचा फुटबॉल केला आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगतात. प्रत्यक्षात मात्र एक दमडीही खात्यात जमा झालेली नाही. यावर सहकार विभाग, तंत्रज्ञान विभागाची चूक असल्याचा कांगावा सरकार करत आहे. यातून सरकार स्वत: पाप झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे ना. विखे यांनी यावेळी सांगितले. 

राज्य सरकार कुपोषण, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तसेच आदिवासी विभागातील योजनांवर सपशेल अपयशी ठरले असून, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस विनायक देशमुख, आ. डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, डॉ. हेमलता पाटील, शाहु खैरे उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.