आई वडिलांचा संभाळ न करणाऱ्या शिक्षकांचा पगार कापणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आपल्या आई वडिलांचा संभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पगारातून ३० टक्के रक्कम कपात करुन, ती रक्कम संबंधितांच्या आईवडिलांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत घेतला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना न शिकविणाऱ्या शिक्षकांच्या अनेक सुविधाही बंद केल्या जाणार आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीच्या सभापती राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेत शिक्षण समितीची सभा पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांच्या अवेळी झालेल्या बदल्यांचाही मुद्दा यावेळी सदस्यांनी उपस्थित केला. शिक्षकांच्या बदल्या उन्हाळ्यातच कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसा ठराव करुन तो शासनाला पाठविण्याचे यावेळी ठरले.

शाळा खोल्यांसाठी निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी प्रत्येकी २० शाळा खोल्यांसाठी निधी द्यावा, अशी मागणी करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला असून, याबाबत लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे व शाळा सलग्न शुल्क जिल्हा परिषद भरणार असल्याचे सभेत ठरले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
शिक्षकांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाहीत. ती इतर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात अशी तक्रार सदस्यांनी यावेळी केली. त्यावर शिक्षकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षकावीत, यासाठी शिक्षकांचे समुपदेशन करण्यावर सभेत चर्चा झाली. 

शिक्षकांचे समुपदेशन करुन त्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करावीत. ज्या शिक्षकांकडून प्रतिसाद मिळणार नाही, अशा शिक्षकांच्या सुविधा काढून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला . जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमध्ये बाल आनंद मेळावे घेण्याचे नियोजनही करण्यावर सभेत चर्चा झाली.

शाळा परिसरात आवळ्याची रोपे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी चर्चेत सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, राहुल झावरे, शिवाजी गाडे, विमल आगवण आदींनी सहभाग घेतला. शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.