महापौर कदम यांचे काम आयत्या पीठावर रेघा ओढण्याचेच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरच्या जनतेला वेठीस कोण धरत आहे, हे बाऊन्स झालेला चेक आणि बंद झालेले पाणी ताजे असताना आपल्या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. तुमच्या झालेल्या खर्चाच्या वसुलीपायी मांजरीने डोळे मिटून किती दूध पिले, हे सगळ्या नगरला माहित आहे. 
-

                                                            ---------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
महापौरांचे आयत्या पीठावर रेघा ओढण्याचेच काम असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी केली आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी 'निवांत राष्ट्रवादी' अशा केलेल्या टीकेवर विधाते व बनसोडे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला.

संयुक्त पत्रकाद्वारे विधाते व बनसोडे यांनी महापौरांच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, यापूर्वी आपणही वीज प्रश्नासाठी मनपात आंदोलने केली. मात्र, त्यात स्वार्थ हेतुच असायचा. मालमत्ता कराच्या शास्तीबाबत तर नागरिकांना शास्तीमाफी दिली तर थोडी मनपाची आर्थिक परिस्थिती जी खालावली आहे, ती सुधारण्यास मदत होईल, एवढीच त्यामागची भूमिका आमची आहे. पण श्रेयासाठी तेही आपण अधिकाऱ्यांना धमकावून शास्तीमाफी न देण्याची दमबाजी आपल्याकडून करण्यात आली आहे, हे दुदैव आहे.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
आज साधारण पावणे दोन वर्षे झाली. आपल्या पक्षाची महापालिकेत सत्ता आहे. साधा दीड वर्षात दीड रुपयाचा निधीही आपल्याला आणता आला नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे सांगून ते म्हणाले की, नुसत्या आयत्या पीठावर रेघा ओढण्याचे कार्यक्रम आपण चालविले आहे. एखाद्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसारखे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत महापालिकेत निवांत बसून वसुलीचा सपाटा आपण चालविला आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करण्याचे अधिकार आपल्याला नाही.

धार्मिक स्थळाबाबत गेली २५ वर्षे धर्माच्या नावावर राजकारण आपण केले. जेव्हा या धार्मिक स्थळावर अतिक्रमणाचे संकट आले, तेव्हा आपली कशी वाघाची शेळी झाली, हे नगरकरांनी पाहिले आहे. उगाच काहीतरी पत्रके काढून नगरकरांचे लक्ष विचलित करु नका. 

निवांत ॲन्टी चेंबरमध्ये बसण्यापेक्षा नगरच्या विकासासाठी प्रयत्न करा आणि आपण म्हटल्याप्रमाणे राजाश्रय असलेल्यांचे कर थकलेत, आपल्या वैयक्तिक पैशाच्या वसुलीपोटी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला नागरिकांच्या घरी वसुलीसाठी पाठवित आहात, असा आरोप करण्यात आला आहे. मनपाच्या इतिहासात 'महापौर' कार्यालयातून याबाबतचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. इतके तर आपले मोठे प्रताप आहे, अशा प्रकारच्या टीकेच्या तोफा विधाते व बनसोडे यांनी डागल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.