पती पत्नीच्या भांडणावरून जावयाने केला सासुरवाडीत गोळीबार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पती पत्नीच्या भांडणावरून झालेाल्या वादातून पतीने सासुरवाडीत दमदाटी करत गोळीबार केला. यात एक महिला जखमी झाली आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळूंज येथे शुक्रवार (दि.२७) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत सविस्तर असे की,राहुल रंगनाथ आल्हाट (रा.पिंपळगाव उज्जैनी,ता. नगर.)याचे त्याची पत्नी अनिता हीच्याशी घरगुती कारणातून किरकोळ वाद झाले.त्या भांडणाचा मनात राग धरून अनिता आपल्या माहेरी वाळूंज येथे जावून राहिली.

याबाबत राहुल आल्हाट याने याच गोष्टीचा राग मनात ठेवून तो सासुरवाडीला गेला आणि पत्नीच्या नावाने अनता तू बाहेर ये असे म्हणाला.यावर अनिता बाहेर आली असता तीला त्याने शिवीगाळ केली. व दमदाटी करत मारहाणही केली, यावेळी तीला सोडवण्यासाठी अनिताचे वडील व भाऊ मध्ये पडले असता. राहुल याने तुम्हाला एकाएकाला संपवूनच टाकतो असे म्हणत जवळच्या पिस्तूलातून गोळी झाडली. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
ही गोळी सौ.रेणुका भाऊसाहेब आढाव (रा.वाळूंज.ता नगर) हिच्या डाव्या दंडावर लागल्याने ती जखमी झाली.या प्रकरानंतर राहुल घटनास्थळावरून फरार झाला.तखमी झालेल्या रेणूका आढाव हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी रेणुका आढाव हिच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.