राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनातून करमणूक करून घेत आहे - संभाजी कदम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी कॉंग्रेस निवांत पार्टी आहे. काही काम धंदे राहिले नाही. कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांनी कोणताही प्रश्न पुढे करायचा आणि त्यावर आंदोलन करायचे, एवढेच काम त्यांना उरले आहे. राष्ट्रवादी अशा आंदोलनातून करमणूक करून घेत आहे. अशा आंदोलनामुळे प्रश्न सुटत नाहीत, तर प्रशासनाचा वेळ वाया जातो. हेच आंदोलनाचे नेतृत्व करणारे विसरल्याची टीका शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शास्ती माफी आणि धार्मिक स्थळांबाबतच्या मुद्यावर कदम बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालविलेले आंदोलने म्हणजे, वेळखाऊ पणा असून, त्यामध्ये नगरकरांना वेठीस धरण्याचे षड.यंत्र आहे. राष्ट्रवादी म्हणजे सध्या निवांत पार्टी आहे. कोणीही कोणत्याही मुद्यावर आंदोलन करते आहे. अभ्यासपूर्ण आंदोलनाची गोष्ट निराळी असते. पण, प्रशासनाला वेठीस धरून त्यांचा कामकाज थांबविणे हे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

महासभा बोलावण्याची मागणी करण्याचे नाटक
धार्मिक स्थळांच्या मुद्यावर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर कदम यांनी चांगलेच सुनावले. ते म्हणाले, 'तीन वर्षांपूर्वी त्यांचीच सत्ता होती. त्या काळात अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली. त्यावेळी त्यांनी यावर योग्य ती भूमिका घेणे अपेक्षीत होते. पण तसे झाले नाही. बघ्याची भूमिका घेत कार्यवाहीचे घोंगडे भिजत ठेवले. आता कार्यवाही सुरू झाल्यावर आरडाओरडा करत आहे. हे त्यांचेच पाप आहे. आता महासभा बोलावण्याची मागणी करण्याचे नाटक करत आहेत
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
राजाश्रय असलेल्यांचे कर थकलेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शास्ती माफीची मागणी करत आहेत, पण ज्यांनी प्रामाणिकपणे शास्तीसह कर भरला त्यांचे काय ? त्यांची शास्ती परत करायचे ठरले तर एका हाताने पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने परत करायचे, अशी वेळ महापालिकेवर येईल. महापौर असताना आपण शास्तीमाफी केली होती, आमदार संग्रामभैय्या जगताप सांगत आहे. महापालिका प्रशासनाला त्यावेळी दिलेल्या शास्तीमाफीची माहिती संकलित करण्यास सांगितले आहे. शास्तीमाफीमुळे महापालिकेचा किती फायदा झाला, याचे आकडेसमोर आल्यावर सांगू, असे सांगून खरे काय आणि खोटे काय हे स्पष्ट होईल, असे देखील संभाजी कदम म्हणाले.

सर्व सामान्यांचे कर लाख रुपयांनी थकीत राहत नाहीत. 
महापालिकेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेला खिळ घालण्याचा प्रकार विरोधक वेगवेगळ्या प्रकारे पुढे करत आहेत.सर्व सामान्यांचे कर लाख रुपयांनी थकीत राहत नाहीत. पण, यांना राजकीय आश्रय आहे अशाच लोकांचे मालमत्ता कर थकीत आहेत, असा आरोप संभाजी कदम यांनी यावेळी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.