महापालिकेकडून विशिष्ट धार्मिक स्थळे टार्गेट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील १९६० नंतरची सुमारे ६८ छोटी-मोठी धार्मिक स्थळे काढण्याची कारवाईच्या तयारी असलेल्या महापालिकेविरोधात हिंदूराष्ट्र सेना आक्रमक झाली आहे. महापालिकेवर आज मोर्चा नेत धार्मिक स्थळांवरील कारवाईत पक्षपात केल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील धार्मिक स्थळांचे पुन्हा खुले सर्वेक्षण करून पुढील कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हिंदूराष्ट्र सेनेच्या या आक्रमकतेमुळे महापालिका प्रशासनाचे अधिकारी काही काळ सुन्न झाले होते. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
हिंदूराष्ट्र सेनेचे घनश्याम बोडके, परेश खराडे, सागर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात आला होता. हिंदूराष्ट्र सेनेच्या या मोर्चामुळे तोफखाना पोलिसांनी अतिरीक्त पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे महापालिका कार्यालय दणाणून गेले होते. उपायुक्त विक्रम दराडे, सभागृह नेता गणेश कवडे, नगरसेवक योगीराज गाडे, प्रशासकीय व पोलीस अधिकारी यांनी मोर्चा घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

शहरातील ६८ सार्वजनिक आणि पाच खाजगी जागेतील, अशी एकूण ७३ धार्मिक स्थळांवर कारवाईची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ही कारवाई एकतर्फी होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. या आरोपामुळे प्रशासन अधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

प्रश्नांना उत्तर देण्यात असमर्थ ठरत असलेल्याने आंदोलनकर्त्यांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिका धार्मिक स्थळांवर करत असलेल्या कारवाई पक्षपातपणा करत आहे. विशिष्ट समाजाची धार्मिक स्थळे टार्गेट करण्यात आली आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
गुपचूप कारवाई का करता? कारवाईत फक्त मंदिरेच का? इतर धार्मिक स्थळे का नाहीत? ती रस्त्यावर असलेल्या धार्मिक स्थळांचे काय? त्यांची कागदपत्रे दाखवा? कार्यालयात बसून सर्वेक्षण कसे पूर्ण झाले? रस्त्यावर फिरून अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण कधी केले? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या सरबती आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर केल्या.

महापालिकेच्या गुपचूप सर्वेक्षणामुळे शहरातील शांतात धोक्यात आली आहे, असा आरोप करता महापालिका अधिकारी सुन्न झाले. शहरातील शांतता रहावी यासाठी महापालिकेने पुन्हा खुले सर्वेक्षण करावे. त्यासाठी आम्ही सहकार्य करू, अशी मागणी घनश्याम खराडे यांनी केली. उपायुक्त विक्रम दराडे, नगररचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे, कल्याण बल्लाळ यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. 

न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसारच ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले. काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसारच सर्व्हे झाला आहे. यावर आंदोलनकर्ते आक्रमक झाले. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कत्तलखान्यांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. 

सभागृह नेता गणेश कवडे व नगरसेवक योगीराज गाडे यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेने कारवाई करताना योग्य ती काळजी घेऊन सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.