२ नोव्हेंबरपासून बळीराजा पुन्हा संपावर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या कर्जमाफी आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान या योजनेतून शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे या सरकारने दुर्लक्ष केले आहे. या प्रश्नावर राज्यातील शेतकरी गुरुवार (२ नोव्हेंबर) पासून राज्यव्यापी संपावर जाणार असल्याचा इशारा शेतकरी आक्रोश कृती समितीचे शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कुंजीर म्हणाले, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले. दिवाळीपूर्वी बँकेत रक्कम जमा होईल, असेही सरकारने जाहीर केले. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
शेती आणि पूरक व्यवसायांची कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती करावी, ६० वर्षांनंतर शेतकरी पती-पत्नीला दरमहा ५ हजार रुपये निवृत्तिवेतन देण्यात यावे. तसेच शेतीसाठी जेवढे कर्ज घेतले आहे त्याचकिमतीची हमी मिळेल, इतकीच स्थावर जमीन म्हणून घ्यावी, या अशा अनेक मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी दि.२ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.