श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी स्टेशनजवळ रेल्वे लुटण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी रेल्वेस्थानकानजिक शुक्रवार दि.२७ रोजी रात्री पावणे नऊ ते नऊ वाजण्याच्या सुमारास १५ ते २० जणांच्या टोळक्याकडून पुणे विलासपूर एक्स्प्रेस ही रेल्वे लुटण्याचा प्रयत्न झाला. यावेळी काही प्रवाशांची प्रत्यक्षात लूट झाली आहे. मात्र या घटनेत प्रत्यक्षात किती मुद्देमाल चोरीला गेला याबाबत मात्र समजले नाही.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत माहिती अशी की, पुणे विलासपूर एक्स्प्रेस शुक्रवार दि.२७ रोजी रात्री पावणेनऊ ते नऊ वाजण्याच्या सुमारास काही तांत्रिक कारणामुळे काष्टी रेल्वेस्थानकाजवळ काही काळ थांबली. काष्टी रेल्वेस्थानकापासून गाडी पुढे निघाली तेव्हा काही अंतरावर गाडी जाताच एस ३,एस ४ डब्यातील कुणीतरी चैन ओढल्याने थांबली.

गाडी का थांबली हे पाहण्यासाठी गाडीतील सुरक्षारक्षक व काहीजण खाली उतरले. तेव्हा त्यांच्या दिशेने व रेल्वे डब्यावर जोरदार दगडफेक सुरू झाली. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सुमारे १५ ते २० जण दगडफेक करत होते. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे एकच गोंधळ उडाला. 

गाडीतील काहींनी लोकांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.पण तो होवू शकला नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार अहमदनगर कंट्रोलरूमवरून तात्काळ श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती दिली गेली.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
योगायोगाने तेव्हा काष्टी येथे श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांचे सहकारी पो.कॉ संभाजी वाबळे ,चालक औटी हे गस्तीवरच होते.या बाबतची माहिती समजताच पोवार यांनी काही स्थानिक ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. 

तेव्हा पोलीसांना पाहाताच सदर दरोडेखोरांनी त्याठिकणाहून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. दरम्यानच्या काळात रेल्वे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान काही प्रवाशांच्या माहितीनुसार हे दरोडेखोर आधीपासून रेल्वेत प्रवासी म्हणून प्रवास करत होते. 

निर्जंनस्थळी गाडी आल्यावर त्यांनी चैन ओढत गाडी लुटण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांच्या माहितीनुसार रेल्वे अ.नगर स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी थांबली तेव्हा काही प्रवाशांचे मोबाईल,गळ्यातील सोन्याची चैन असा बराच ऐवज या दरोडेखोरांनी लुटला.

दरम्यान पो नि पोवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .परंतु अडचणीचा रस्ता, व सर्वत्र अंधार असल्याल्यामुळे चोर पसार झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.