दिवाळी फराळ खासदार गांधींचा,चर्चा आमदार जगताप पितापुत्रांची !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दिवाळीच्या फराळ कार्यक्रमात राजकीय मंडळींकडून पुढील गणिते बांधली जातात, हे सर्वश्रूत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचे फराळ कार्यक्रम चांगलेच गाजत आहेत. 




----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आता भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व त्यांचे वडील विधानपरिषदेतील आमदार अरुण जगताप यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे सदस्य खासदार दिलीप गांधी यांनी नुकताच दिवाळीनिमित्त फराळ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये भाजपचे जिल्ह्यातील नेते, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. फराळ कार्यक्रमाला पक्षापेक्षा वैयक्तिक प्रेमापोटी स्पर्धक पक्षातील नेतेही हजेरी लावतात.


गांधी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आमदार जगताप पितापुत्रांनी हजेरी लावली. आगामी काळातीलच नव्हे, तर प्रत्येक निवडणुकांना विरोधक म्हणून उभे राहत असताना या कार्यक्रमाला मित्र म्हणून आलेले आमदार चर्चेचा विषय ठरले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.