उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची तारीख पे तारीख; गडकरीही करणार नाहीत भूमिपूजन

दैनिक लोकमत अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची १४ आॅक्टोबरनंतर जाहीर झालेली २९ आॅक्टोबरची तारीख म्हणजे पुन्हा एकदा फुसका बार ठरला आहे. २९ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्ह्यात येणार असले तरी ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार नाहीत. पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रत्यक्ष काम सुरु झाल्यानंतर भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे सांगून आता पुढच्या तारखीची प्रतीक्षा वाढवली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने मुंबईत बैठक घेतल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी २९ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार असल्याची नवी तारीख जाहीर केली होती. मात्र गडकरी हे २९ आॅक्टोबरला संगमनेर, शनि शिंगणापूरच्या दौ-यावर असून त्यांनी नगरकडे पाठ फिरवली असल्याची माहिती आहे. 

या पार्श्वभूमीवर नगरमध्ये झालेल्या महापौरांच्या फराळ कार्यक्रमात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी उशीर झाला तरी प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच भूमिपूजन होईल, असे स्पष्ट केले. उड्डाणपूल होणारच आहे. मात्र सर्व प्रक्रिया व प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर भूमिपूजन होईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे २९ आॅक्टोबरला उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
खासदारांचा थाट... पालकमंत्र्यांचा स्नेहाचा ‘पूल’
खा. दिलीप गांधी यांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी हजेरी लावून आपसातील ‘स्नेह’ वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. शहराच्या आस्थेचा विषय असलेल्या उड्डाणपुलाबाबत पालकमंत्र्यांनी मात्र तेथे ‘ब्र’ही काढला नाही. 

महापौर सुरेखा कदम यांच्याकडील फराळ कार्यक्रमात मात्र उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाबाबत पालकमंत्र्यांनी ग्वाही दिल्याने शिवसेनेचाही ऊर भरून आला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्नेहाचा पूल नेमका कुठे बांधला? याची चर्चा सुरू झाली. खासदार गांधी यांच्याकडील फराळ कार्यक्रम म्हणजे शाही लग्नाचाच थाट होता. 

हा थाटमाट पाहून कर्डिलेही चांगलेच भारावले. हा शाही थाट पाहून ‘पुढच्या वेळीही तुम्हीच खासदार होणार. कामाची दखल घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागावी’ अशी शुभेच्छा देण्यासही कर्डिले विसरले नाहीत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.