नगर शहराच्या विकासासाठी बार्शीकरांनंतर खा.दिलीप गांधींनी लक्ष घातले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरामध्ये वर्षानुवर्षे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. मध्यनगर भागात जुन्या काळात विकासकामे झाली. त्यानंतर कोणीही विशेष लक्ष मध्य नगरच्या विकासाकरिता घातले नाही. तत्कालिन नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांनी नगर शहराच्या विकासासाठी मोठी कामे केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
त्यानंतर मात्र केवळ खा. दिलीप गांधी यांनी नगर शहराच्या विकासात लक्ष घालून शहरामध्ये मोठी विकासकामे केली. त्यांच्याच पद्धतीने गटनेते सुवेंद्र गांधी आपल्या प्रभाग २० मध्ये विकासकामे मार्गी लावत आहेत. असे प्रतिपादन उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केले.

गटनेते सुवेंद्र गांधी यांच्या प्रयत्नातून प्रभाग २० मधील ख्रिस्तगल्ली ते महावीर गल्लीपर्यंत बंद पाईप गटार, काँक्रिटीकरण व जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा प्रारंभ संगम चौक येथे प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी छिंदम बोलत होते. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
याप्रसंगी सरला बोगावत, जयकुमार मुनोत, राजेंद्र पारख, किशोर बोरा, विलास देवी, प्रशांत मुथा, सचिन बोगावत, आभा बोगावत, जयश्री गांधी, लता गुगळे, सुनीता चोपडा, श्रीमती देवी, नीलेश बोरा, घोरपडे, दिलावर शेख, सलीम शेख आदींसह नागरिक उपस्थित होते.

सुवेंद्र गांधी म्हणाले की, प्रभागात सर्व कामे झालेली आहेत. मात्र, प्रभाग हा शहराचा जुन्या परिसरात मोडतो. या भागात फार पूर्वी झालेली कामे आजच्या परिस्थितीनुसार कुचकामी ठरत असून, तेथे नव्याने कामे करण्याशिवाय पर्याय नाही. 

तेथे विविध योजनांच्या माध्यमातून नव्याने कामे करण्याला प्राधान्य देत आहे. प्रभागातील नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत आहे, असे सांगितले. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक विलास देवी यांनी केले, तर आभार प्रशांत मुथा यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.